काही दिवसांपूर्वीच Honor 90 5G लाॅंच करण्यात आला आहे. मात्र, बऱ्याच कारणांनी हा फोन चर्चेत राहिला आहे. खास करुन कंपनी तिच्या किमतीमुळे चर्चेत होती. हा फोन देशात 37,999 रुपयांना लाॅंच करण्यात आला होता. पण, कंपनीने लगेच यावर बॅंक ऑफर आणि फ्री प्रोडक्ट बंडल देऊन किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला.
पण, यामुळे लोक कन्फ्युज झाले असून बऱ्याच जणांनी याची निराशा सोशल मीडियावर व्यक्त केली. तसेच, काही जणांनी मिळत असेलेल्या ऑफर पाहून लाॅंचची किंमत फसवी असल्याच्या भावना ही व्यक्त केल्या आहेत. यामुळे कंपनीने पहिला फोन लोकांनी उत्साहाने खरेदी करावा.
यासाठी ऑनरने (HTech in India) किमतीत बदल केला असून पहिल्या सेल ऑफरदरम्यान हा फोन खरेदी केल्यास फोनवर 8,000 रुपयांपर्यंत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Honor 90 5G वर ऑफर्सचा धमाका
Honor 90 5G च्या (ऑनर 90 5जी) बेस व्हेरियंटची किंमत 37,999 रुपये होती पण आता तुम्हाला बँक कार्डद्वारे 3,000 रुपये इन्स्टंट डिस्काउंट आणि कंपनीकडून डायरेक्ट कूपन म्हणून 5,000 रुपयांची आणखी एक सूट मिळत आहे. यामुळे ऑनर 90 5 जी तुम्ही 29,999 रुपयांत घेऊ शकणार आहात. तसेच कंपनी फोनवर 2,000 रुपयांचा अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. त्यामुळे ग्राहक या गोष्टीचा ही लाभ घेऊ शकणार आहेत.
🚨 Big Announcement Alert 🚨
— Madhav Sheth (@MadhavSheth1) September 17, 2023
Your voice matters! As a customer-centric team, we've listened to your feedback and acted on it.
For our #HONOR90 FIRST SALE OFFER, we're switching gears! 🔄 Instead of TWS, we're giving you DIRECT COUPON/DISCOUNT worth Rs. 5000.
First Sale Go…
फक्त पहिल्या सेलवर मिळणार ऑफर
ही ऑफर फक्त पहिल्या सेलदरम्यान उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही आज 18 सप्टेंबरला हा फोन खरेदी केल्यास, तुम्हाला या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा फोन घ्यायचा असल्यास तुमच्याकडे पात्र कार्ड असेल तर तुम्हाला फक्त 3,000 रुपयांपर्यत बॅंक डिस्काउंट मिळणार आहे. हा फोन तुम्ही आज दुपारी बारा वाजतापासून अॅमेझाॅन आणि जवळच्या स्टोअरवरुन खरेदी करु शकणार आहात.
या गोष्टींमुळे आहे फोन खास
हा फोन तुम्हाला 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाच्या क्वाड कर्व्हड एमोलेड (AMOLED) डिस्प्लेसह मिळणार आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चिपसेटसह 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत यूएफएस 3.1 इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध असणार आहे. याशिवाय ऑनर 90 5 जी अँड्रॉइड 13-बेस्ड MagicOS 7.1 वर चालत असून गुगल अॅप्सलाही सपोर्ट करते.
विशेष म्हणजे या फोनमध्ये मागील बाजूस 200MP ट्रीपल कॅमेरा सिस्टम, 12MP अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच, फ्रंट कॅमेरा तुम्हाला 50MP चा मिळणार आहे. याचबरोबर फोनला 5000mAh ची बॅटरी असून तुम्ही 66W वेगाने झटपट चार्ज करु शकणार आहात.