तुम्हाला होम लोन हवंय म्हटल्यावर तुमची सॅलरी महत्वाची आहे. कारण, तुम्हाला किती रक्कम द्यायची हे या सॅलरीवरुन ठरवल्या जाते. तसेच, बॅंका आणि वित्तीय संस्था तुम्हाला लोन देण्यासाठी तुमच्या पात्रतेचे मूल्याकंन करण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा प्राथमिक घटक म्हणून सॅलरीकडे पाहतात. त्यामुळे सॅलरी तुम्हाला मिळत असल्यास, तुम्हाला लोन मिळवायला जास्त अडचणी येत नाहीत.
सॅलरी कशी ठरवते लोनची रक्कम?
लोन देणाऱ्या बॅंकाचे अन्य निकष आणि नियम सोडले तर, लोनची रक्कम सामान्यत: तुमचा EMI आणि NMI च्या गुणोत्तराच्या आधारावर मोजली जाते. जेथे निव्वळ मासिक उत्पन्न (NMI) कर आणि पेरोल कपातीनंतर टेक होम पे मिळते. SBI होम लोन पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या निव्वळ वार्षिक उत्पन्नाच्या स्लॅबसाठी EMI/NMI गुणोत्तर 20 टक्के ते 70 टक्क्यांदरम्यान बदलते. याशिवाय सहअर्जदाराचा समावेश करून लोनची रक्कम वाढवता येते.
या दोन गुणोत्तरांच्या आधारावर तुम्ही जास्तीतजास्त होम लोन मिळवू शकता. समजा, तुमचा NMI 50,000 रुपये असेल आणि तुम्हाला 80 लाख रुपयांचे लोन घ्यायचे असेल तर लेंडर तुमचा EMI/NMI चे गुणोत्तर चेक करेल. जर तुमचा EMI मर्यादेच्या आत असल्यास, लेंडर तुमचे LTV गुणोत्तर चेक करेल. जर तुमचे LTV गुणोत्तर मर्यादेच्या आत असेल तर तुमचे लोन लेंडर मंजूर करेल.
LTV म्हणजे काय?
LTV लोनच्या संदर्भात उपयोगी येते, विशेषत:रियल इस्टेटसाठी तारण लोनच्या संदर्भात LTV म्हणजेच लोन-टू-व्हॅल्यू गुणोत्तर होय. LTV गुणोत्तर हे एक आर्थिक मेट्रिक आहे जे लोनची रक्कम आणि मूल्यांकन मूल्य किंवा वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तेची खरेदी किंमत यांच्यातील संबंध व्यक्त करते.
तारण लोनच्या बाबतीत, हे अॅसेट सहसा मालमत्ता किंवा घर असते. तसेच, तुमच्या सॅलरी व्यतिरिक्त, लेंडर तुमच्या होम लोनची रक्कम ठरवताना अन्य घटकांचाही विचार करतात. जसे की, तुमचा क्रेडिट स्कोअर, तुमच्या कामाची हिस्ट्री आणि तुम्ही घेतलेले लोन. त्यामुळे लोन घेताना, कर्जदाराने या बाकींच्या गोष्टी सुद्धा मेंटेन करुन ठेवणे गरजेचे आहे.
होम लोनचा सॅलरीवर कसा परिणाम होतो?
- फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो:
तुमच्या लोनची पात्रता चेक करण्यासाठी लेंडर्स एक सूत्र वापरतात. ज्यामुळे तुमचे मासिक उत्पन्न, अस्तित्वातील वित्तीय बांधिलकी आणि तुमच्या लोनचा अवधी विचारात घेतला जातो. सर्वात जास्त वापरले जाणारे सूत्र म्हणजे, फिक्स्ड ऑब्लिगेशन टू इन्कम रेशो (FOIR).
जे तुमच्या उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला परवडणारा जास्तीतजास्त EMI निर्धारित करतो. FOIR तुमच्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर सुमारे 50-60 टक्के ठरवले जाते. त्यामुळे सॅलरीचा थेट परिणाम तुम्ही भरणाऱ्या कमाल EMI वर होतो, ज्याचा परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या लोनच्या रकमेवर होतो.
- लोन-टू-इन्कम रेशो:
लेंडर्स लोन-टू-इन्कम रेशो (LTI) देखील विचारात घेतात, जे तुमच्या उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला जास्तीतजास्त लोन रक्कम निश्चित करते. LTI गुणोत्तर सहसा तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या सुमारे 2.5 ते 6 पट असते. समजा, तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि लेंडर्सचे LTI गुणोत्तर 4 असेल तर तुम्ही 40 लाख रुपयांपर्यंतच्या लोनसाठी पात्र ठरू शकता.