Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan EMI Reduce: गृहकर्जाचा EMI कमी करण्यासाठी 'या' 4 टिप्स नक्की फॉलो करा

Home Loan EMI Reduce

Home Loan EMI Reduce: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मे 2022 पासून आत्तापर्यंत सहा वेळा रेपो रेटमध्ये (Repo Rate) बदल केला आहे. ज्यामुळे अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. या व्याजदर वाढीमुळे लोकांच्या गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये (EMI) वाढ झाली आहे. ही वाढ कशी कमी करता येईल, याबद्दल आज जाणून घेऊयात.

गृहकर्जाच्या मदतीने अनेकजण स्वतःच्या स्वप्नातील घराची खरेदी करतात. मात्र मे 2022 पासून आत्तापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये (Repo Rate) सहा वेळा बदल केले  आहेत. त्यामुळे साहजिकच अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केल्याचे पाहायला मिळाले. सध्या मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. असे असताना गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्याने सर्वसामान्य लोकांचे घर खरेदीचे स्वप्न आता अवघड झाले आहे. ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे, त्यांच्या गृहकर्जाचा हप्ता किंवा कालावधी दोन्हीपैकी एक वाढले आहे. त्यामुळे वाढलेल्या  गृहकर्जाचा हप्ता कसा कमी करायचा, याबद्दल आज जाणून घेऊयात.

गृहकर्जाचा हप्ता अशा प्रकारे करता येईल कमी

फिक्स्ड व्याजदराची निवड करा

गृहकर्ज घेताना फिक्स्ड व्याजदराची (Fixed Interest Rate) निवड करा. याचा फायदा असा की, तुम्हाला मिळालेला व्याजदर हा फिक्स्ड असेल. बाजारपेठेत कितीही व्याजदर वाढला किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कितीही वाढवला, तरी त्याचा परिणाम तुमच्या गृहकर्जावर होणार नाही. याउलट जर तुमच्या कर्जाचा व्याजदर हा फ्लोटिंग (Floating Interest Rate) स्वरूपातील असेल, तर मात्र तुमचा व्याजदर सतत बदलत राहील. वाढत्या व्याजदराचा सर्वात मोठा फटका फ्लोटिंग व्याजदर स्वीकारणाऱ्यांना बसतो.

कमी व्याजदर देणाऱ्या बँकेमध्ये गृहकर्जाचे हस्तांतरण करा

बऱ्याच वेळा गृहकर्ज घेतल्यानंतर कर्जदाराला माहीत होते की, आपण भरत असलेल्या व्याजदराच्या तुलनेत इतर बँका कमी व्याजदर देत आहेत. अशा परिस्थितीत कर्जदाराने कमी व्याजदर घेणाऱ्या बँकेमध्ये कर्जाचे हस्तांतरण करणे केव्हाही चांगले. असे केल्याने EMI कमी होण्यासाठी आणि दीर्घकालीन कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मदत होते.

गृहकर्जाचे प्रीपेमेंट करा

लवकरात लवकर गृहकर्ज फेडायचे असेल, तर बँकेकडून प्रीपेमेंटची सुविधा (Prepayment Facility) दिली जाते. प्रीपेमेंट केल्याने तुम्ही घेतलेली गृहकर्जाची रक्कम कमी होईल. ज्याचा साहजिकच फायदा तुमच्या EMI वर होणार आहे. तुम्ही बँकेला एकरकमी पैसे देऊन प्रीपेमेंट (One time Prepayment)  करू शकता किंवा मासिक स्वरूपात थोडे थोडे पैसे भरून प्रीपेमेंट (Monthly Prepayment) करू शकता. बऱ्याच बँका प्रीपेमेंट करण्यासाठी काही चार्जेस स्वीकारतात. जर तुम्हाला दीर्घकालीन कर्ज फेडण्यासाठी प्रीपेमेंट मदत करत असेल, तर प्रीपेमेंट चार्जेस भरून तुम्ही गृहकर्जाची रक्कम कमी करू शकता.

डाऊनपेमेंटची रक्कम वाढवा

जर तुम्ही गृहकर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रामुख्याने बहुतांश लोक 20 % डाऊनपेमेंट (Down payment) करतात, तर उर्वरित 80% रकमेचे कर्ज घेतात. यामध्ये थोडा बदल तुम्हाला करावा लागणार आहे. कर्जदाराने डाऊनपेमेंटची रक्कम वाढवल्यानंतर आपोआप एकूण कर्जाची रक्कम कमी होण्यासाठी मदत होते. कमी कर्ज याचा सरळ सरळ अर्थ असा की, कमीत कमी EMI.

Source: hindi.moneycontrol.com