• 27 Mar, 2023 05:37

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

होम लोन घेण्याचा विचार करतायं? तर जाणून घ्या 5 प्रकार

5 Types of Home Loans

यंदा नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील विविध बॅंका या 5 प्रकारचे होम लोन उपलब्ध करून देत आहे. हे होम लोन कोणत्या प्रकारचे आहे व आपल्या बजेटनुसार कोणते होम लोन फायदेशीर ठरेल हे खालीलप्रमाणे जाणून घ्या.

5 Types of Home Loans: स्वत:चे घर घेण्यासाठी होम लोन घ्यायचे आहे. पण ते कसे व कोणते घ्यावे, याची पुरेपुर माहिती मिळत नाही, तर तुमच्यासाठी हा लेख खूप फायदेशीर ठरणार आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला होम लोनचे पाच प्रकार सांगणार आहोत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही होम लोनसाठी योग्य पर्याय निवडा व आपले घराचे स्वप्न पूर्ण करा.

होम परचेस लोन (Home Purchase Loan)

 स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी होम परचेस लोन हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये प्लाॅटच्या किंमतसोबतच घर बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो यासंबंधी किंमतीचा समावेश असणार आहे. प्लाॅट खरेदी केल्यापासून एका वर्षाच्या आत कर्ज घेतले तरच त्याच्या किंमतींचा समावेश केला जाईल.

नवीन फ्लॅट किंवा घर खऱेदीसाठी घेतलेल्या कर्जालादेखील होम परचेस लोन असे म्हणतात. जर तुम्ही कोणत्याही ठिकाणी नवीन घर म्हणजेच मालमत्ता खऱेदी करणार असाल तर बॅंकेच्या माध्यमातून 90 टक्क्यापर्यंत कर्ज मिळण्याची शक्यता असते. त्यात ही बॅंका या 80 टक्क्यांपर्यंत कर्जाचा पुरवठा करतात. कर्जाचा कालावधी हा 20 ते 30 वर्ष दरम्यानचा असतो. 

होम एक्सटेंशन लोन (Home Extension Loan)

जर एखाद्या व्यक्तीचे घर हे वन आरके असेल आणि त्याला जर ते घर वन बीएचके किंवा टू बीएच के करायचे असेल तर यासाठीदेखील तो व्यक्ती बॅंकेकडून कर्ज घेवु शकतो. थोडक्यात घराचा आकार वाढवायचा असेल, तर बॅंकेकडून ठराविक कर्जाची रक्कम मिळते. या कर्जाला होम एक्सटेंशन लोन असे म्हणतात.

होम इम्प्रूवमेंट लोन (Home Improvement Loans)

जर एखादया व्यक्तीला घर रिन्युवेशन म्हणजेच घर दुरूस्ती, पेंटिंग किंवा नूतनीकरण करायचे असेल तर यासाठीदेखील त्या व्यक्तीला बॅंकेकडून कर्ज मिळते. यासाठी बॅंका या होम इम्प्रूवमेंट लोन देतात. जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्या घराचे रिन्युवेशन करता येईल.

ब्रिज होम लोन (Bridge Home Loan)

ब्रिज होम लोन हे अल्पावधीसाठी म्हणजेच साधारण दोन वर्षासाठी असते. हे एका प्रकारचे सिक्युर्ड लोन आहे. हे कर्ज घेतले तर यामध्ये व्याजदर देखील जास्त असते. हे कर्ज त्या त्या व्यक्तीला मालमत्ता खरेदी-विक्री दरम्यान दिले जाते. हे कर्ज नवीन मालमत्तेच्या किंमतीच्या 70 टक्के ते 90 टक्क्यांपर्यंत उपलब्ध करून देतात. कर्जाची ही रक्कम त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यानुसार त्या व्यक्तीला कर्ज दिले जाते.