Interest Rate On FD: 444 दिवस ते 15 महिन्यांसाठी केलेल्या एफडी गुंतवणुकीवर, 5 बँका ग्राहकांना सर्वाधिक व्याज दर देत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदतपूर्व पैसे काढण्याबाबतचे नियम सोपे करण्यात आले आहेत. SBI ने आपल्या ग्राहकांना गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळावा यासाठी अमृत कलश ही विशेष FD योजना सादर केली आहे. या गुंतवणूक योजनेवर बँक सर्वाधिक व्याज देत आहे. याशिवाय कॅनडा बँक, एचडीएफसी बँक, येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने 444 दिवसांपासून ते 15 महिन्यांपर्यंतच्या मुदतीच्या एफडीवर गुंतवणूकदारांना जास्त व्याजदर देऊ केले आहेत.
Table of contents [Show]
एसबीआयची अमृत कलश
SBI ची 400 दिवसांची विशेष FD योजना अमृत कलश मध्ये सामान्य गुंतवणूकदारांना 7.10 % व्याज दिल्या जात आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणुकीवर 7.60 % व्याज दिल्या जात आहे. SBI बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे, गुंतवणूकदार 12 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत अमृत कलश योजनेत गुंतवणूक करू शकतात.
आयसीआयसीआय बँक
ICICI बँकेने सामान्य नागरिकांसाठी 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 6.70 % व्याजदर देऊ केला आहे. तर, 15 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 7.10 % व्याजदर देत आहे. बँकेचे हे व्याजदर 24 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
एचडीएफसी बँक
HDFC बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.60 % व्याज दर देत आहे. तर, 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या गुंतवणुकीवर बँकेने 7.10 % व्याजदर दिला आहे. 4 वर्षे, 7 महिने ते 55 महिन्यांच्या गुंतवणुकीवर सर्वाधिक 7.25 % व्याजदर देण्याची घोषणा केली आहे.
येस बँक
Yes Bank आपल्या ग्राहकांना 1 वर्ष ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.50 % व्याज दर देत आहे. बँकेचा हा व्याजदर 2 मे 2023 पासून लागू झालेला आहे.
कॅनडा बँक
Canara Bank 444 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वाधिक 7.25 % व्याज दर देत आहे. हे व्याजदर 5 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले व्याजदर
गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यावे की, बँकेच्या FD योजनांवरील हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीच्या रकमेसाठी लागू आहेत. तसेच हे व्याजदर फक्त सामान्य नागरिकांसाठी लागू आहेत, ज्येष्ठ नागरिकांना इतर ग्राहकांपेक्षा 0.5 % जास्त परतावा मिळतो. तर, आंशिक पैसे काढणे किंवा मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम प्रत्येक बँकेत वेगळे आहेत.