Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC SKY : एचडीएफसीने लॉन्च केले ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी ऑल ईन वन स्काय ॲप

HDFC SKY :  एचडीएफसीने लॉन्च केले ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी ऑल ईन वन स्काय ॲप

Image Source : www.hdfcsky.com

शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी Zerodha, Groww, Upstox, 5Paisa या सारखे अनेक कंपन्यांचे ट्रेडिंगचे ॲप उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे एचडीएफसी स्काय हे अॅप ऑल इन वन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेअर बाजारातील ट्रेंडिंगसह गुंतवणूकदारांना आयपीओ, कमोडिटीज, म्युच्युअल फंड, फ्युचर्स आणि ऑप्शन्स या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

एचडीएफसी बँकेची उपकंपनी आणि स्टॉक ट्रेडिंग कंपन्यांमध्ये अग्रणी असलेल्या एचडीएफसी सिक्योरिटीजने एचडीएफसी स्काय (HDFC SKY) हे ॲप लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्सना शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासह गुंतवणुकी संदर्भातील माहिती आणि पर्याय याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्काय अॅपच्या माध्यमातून ट्रेडिंग करण्यासाठी 20 रुपये शुल्क निश्चित केले आहे.

ऑल इन वन ॲप-

शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी  Zerodha, Groww, Upstox, 5Paisa या सारखे अनेक कंपन्यांचे ट्रेडिंगचे ॲप उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे एचडीएफसी स्काय हे ॲप ऑल इन वन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेअर बाजारातील ट्रेंडिंगसह गुंतवणूकदारांना आयपीओ, कमोडिटीज, म्युच्युअल फंड, फ्युचर्स आणि ऑप्शन्स या सारख्या पर्यायामध्ये गुंतवणुकीच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या अॅपवर कंपनीने फ्री ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेत एक वर्षासाठी कोणाताही मेंटनन्स चार्ज आकारला जाणार नाही.

ट्रेडिंग आणि गुंतवणुकीच्या सुविधा

एचडीएफसी स्काय हे अॅप बाजारात उपलब्ध असलेल्या इतर ट्रेडिंग अॅप्सप्रमाणे वापरता येणार असून हे सर्व गुंतणूकदारांसाठी खुले आहे. मात्र स्काय अॅपचे वेगळेपण हे आहे की या अॅपवरून शेअर मार्केट ट्रेंडिग शिवाय इतरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधा युजरला सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येणार आहे. तसेच बाजारातील गुंतवणुकीच्या योजना, यासह विविध पर्याय युजरला उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कंपनी स्काय अॅपच्या माध्यमातून  मार्केटमधील गुंतवणूकदारांचा मोठा हिस्सा वळवण्याच्या तयारीत आहे.