एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारीख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी हाऊसिंग फायनान्स (Housing finance) कंपनी एचडीएफसीचे शेअर स्टॉक एक्स्चेंजमधून (Stock exchange) डिलिस्ट केले जाणार आहेत. ते शेअर्स एचडीएफसी बँकेचे शेअर्स म्हणून व्यवहार केले जाणार आहेत. या विलीनीकरणाची (Merger) प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी आरबीआयनं एप्रिलमध्ये एचडीएफसी बँकेला काही नियामक दिलासा दिला होता.
बँकेच्या सर्व शाखांमध्ये एचडीएफसीच्या सेवा
दीपक पारेख म्हणाले, की एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये एचडीएफसी सेवा उपलब्ध असणार आहे. समजा तुम्ही एचडीएफसीकडून कर्ज घेतलं असेल, तर तुम्ही आता एचडीएफसी बँकेचे ग्राहक झालेले असाल. एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स आणि एचडीएफसी बँक यांचं विलीनीकरण होत आहे. कॉर्पोरेट विश्वातलं आतापर्यंतचं हे सर्वात मोठं विलीनीकरण असणार आहे. या विलीनीकरणानंतर एचडीएफसीची एकत्रित मालमत्ता 18 लाख कोटींहून अधिक असणार आहे.
HDFC chairman Deepak Parekh says the merger of the corporation with HDFC Bank will be effective July 1
— Press Trust of India (@PTI_News) June 27, 2023
ग्राहकांसाठी 5 महत्त्वाच्या बाबी...
- सर्व ग्राहकांना आता पहिल्याप्रमाणेच एचडीएफसी-एचडीएफसी बँकेच्या सर्व सेवा मिळत राहतील.
- एचडीएफसी बँकेत गृह कर्ज सेवा उपलब्ध असणार आहे.
- एचडीएफसी बँकेच्या सुविधा एफडी धारकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
- एचडीएफसी सेवा एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील.
- तुमच्या डीमॅट खात्याच्या सुविधाही पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.
शेअरधारकांना दिले जाणार शेअर
1 जुलै रोजी विलीनीकरण झाल्यानंतर, एचडीएफसी शेअर्स 13 जुलै रोजी बाजारातून डिलिस्ट केले जाणार आहेत. एचडीएफसीची शेवटची बोर्ड बैठक 30 जूनला होणार आहे. दीपक पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी एचडीएफसीचे शेअर्स डिलिस्ट होतील. त्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे शेअर एचडीएफसीच्या शेअरधारकांना दिले जातील. एचडीएफसी उत्पादनं आणि सेवा एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असतील.