Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Earthquake System for Android Users: गुगलने भारतातील Android Users साठी आणले खास फिचर, आपत्तीची मिळणार अपडेट

Android

Image Source : http://www.crisisresponse.google/

Google ने भारतात आपली 'Android Earthquake Alerts System' लाँच केली आहे. या फिचरमुळे युजर्सना भूकंपाचे 'रिअल टाईम अलर्ट' मिळतील. आपत्तीसंबंधी सजग राहण्याच्या दृष्टीने आणि भूकंपापासून जीव व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी हे फिचर तात्काळ सूचना देते.

Google ने भारतात आपली 'Android Earthquake Alerts System' लाँच केली आहे. या फिचरमुळे  युजर्सना भूकंपाचे 'रियल टाईम अलर्ट' मिळतील. सुरुवातीचे हादरे शोधण्यासाठी ही प्रणाली अँड्रॉइड उपकरणांमध्ये एक्सेलेरोमीटर (accelerometers) वापरते. आपत्तीसंबंधी alert (सजग) राहण्याच्या दृष्टीने आणि भूकंपापासून जीव व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी  हे फिचर फास्ट इंस्ट्रक्शन्स  पाठवते. Google ची ही अत्यंत उपयुक्त भूकंप सूचना प्रणाली भारतात अंमलात आली आहे.

Android Earthquake Alerts System

गुगलने 2020 मध्ये या फिचरची घोषणा केली होती. युजर्स या फिचरच्या साह्याने भूकंपासंबंधित सुरक्षा माहिती देखील मिळवू  शकतात.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि भूविज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) यांच्या सहकार्याने Android भूकंप सूचना प्रणाली सुरू केली असल्याचे गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे जाहीर केले आहे . यापूर्वी Google ने Google Search आणि Maps द्वारे वापरकर्त्यांना पूर आणि चक्रिवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबत सुरक्षितता माहिती देण्यासाठी NDMA सोबत सहकार्य केले आहे. .

कोणाला वापरता येणार हे फिचर 

अँड्रॉईड 5 किंवा त्यापेक्षा अपडेटेड डिव्हाइसेस असलेल्या Android युजर्सना येत्या आठवड्यापासून हे फिचर  वापरायला मिळेल . वापरकर्त्यांकडे वाय-फाय किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. Android Earthquake Alert आणि लोकेशन सेटिंग्ज दोन्ही ऍक्टीव्हेट असल्याची खात्री करा. याव्यतिरिक्त, जेव्हा युजर्स 'earthquake near me'  सारख्या  टर्म्स शोधतात तेव्हा त्यांना सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी संबंधित माहिती पुरविली जाईल .

कसे काम करेल  Earthquake System 

जेव्हा अँड्रॉइड फोन सुरुवातीचे धक्के ओळखतो तेव्हा तो हा डेटा सेंट्रल सर्व्हरला पाठवतो. एकाच क्षेत्रातील अनेक फोन्सना समान थरथरणे आढळल्यास, सर्व्हर भूकंपाच्या वैशिष्ट्यांचा अंदाज लावू शकतो, ज्यामध्ये त्याचा केंद्रबिंदू आणि तीव्रता लक्षात येते . त्यानंतर, ते जवळच्या Android डिव्हाइसेसना वेगाने इंस्ट्रक्शन्स पाठवते. हे अलर्ट युजर-फ्रेंडली असल्याचे गुगलने नमूद केले आहे .विविध भारतीय भाषांमध्ये हे फीचर उपलब्ध आहे

Earthquake Alerts System हे  Android स्मार्टफोनमधील अंगभूत सेन्सर्सचा वापर करते, ज्यांना एक्सीलरोमीटर म्हणून ओळखले जाते.एक्सीलरोमीटर लघु भूकंपमापक म्हणून कार्य करू शकतात. भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि याचा लवकर इशारा  मिळाल्यास जिवीत तसेच मालमत्तेचे रक्षण करता येईल. Android च्या या नवीन उपक्रमामुळे भारतातील Android वापरकर्त्यांना भूकंपाचा लवकर अलर्ट मिळेल व त्यांना वेळेवर सावधगिरी बाळगता येईल.