Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sony Vlog Camera ZV-1: Vloggers साठी आनंदाची बातमी! सोनीचा व्लॉग कॅमेरा भारतात लॉन्च

Sony new vlogging camera

Image Source : www.sony.co.in

Sony Vlog Camera ZV-1: Sony कंपनीने आपली उत्कृष्ट Vlogging कॅमेरा मालिका ZV अंतर्गत नवीन कॅमेरा लॉन्च केला आहे. 2020 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या ZV-1 कॅमेऱ्याचे हे पुढचे व्हर्जन असणार आहे.

अलिकडच्या काळात व्लॉगिंग व्हिडिओ ब्लॉगिंग कॅमेरा व उपकरणांना प्रचंड लोकप्रियता मिळतेय. YouTube, Instagram आणि Facebook सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्लॉगर्सची संख्या वाढत चालली आहे. अधिकाधिक लोक त्यांच्या कल्पना आणि लाईफस्टाईल इतरांसोबत शेअर करण्यासाठी व्लॉगिंगकडे वळत आहेत. व्लॉग तयार करण्यासाठी मुख्य म्हणजे एक चांगला कॅमेरा असणे गरजेचे आहे. व्लॉगिंगसाठी Sony कंपनीने कंटेंट क्रिएटर्स आणि व्लॉगर्सला लक्षात घेऊन भारतात ZV-1F हा कॅमेरा लॉन्च केला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने या कॅमेराची अधिकृत घोषणा केली होती.

Sony ची सर्वात लोकप्रिय Vlogging मालिका

नवीन Sony ZV-1F कंपनीच्या लोकप्रिय व्लॉगर कॅमेऱ्यांच्या ZV मालिके अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे. हा कॅमेरा ZV-1'चे पुढचे व्हर्जन आहे. जे 2020 मध्ये लॉन्च करण्यात आला होते. नवीन ZV-1F हा दर्जेदार Zeiss ब्रॅण्डिंग सह एक पॉकेट कॅमेरा आहे. 20-मेगापिक्सेल BSI CMOS सेन्सरसह  20mm f/2.0 प्राइम लेन्स 30 फ्रेम्स प्रति सेकंद किंवा 120fps पर्यंत स्लो-मोशनमध्ये 1080p पर्यंत 4K व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. कॅमेर्‍याचे वजन फक्त 229 ग्रॅम आहे जेणेकरुन व्लॉगर्सना सोबत घेऊन फिरणे सोपे होईल.

Sony कंपनीचा हा व्लॉगिंग कॅमेरा सर्व Sony Center, Alpha Flagship Stores, Sony अधिकृत डीलर्स, ईकॉमर्स वेबसाइट्स (Amazon आणि Flipkart) आणि भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्समध्ये एप्रिल 2023 पासून उपलब्ध होईल. या कॅमेऱ्याची किंमत 50,690 रुपये इतकी आहे.

नवीन ZV-1F मध्ये व्हॅरी-एंगल एलसीडी टच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये झूम सेटिंगसह टच मेनू देखील देण्यात आला आहे. तसेच कंपनीने ट्रस्ट फोकस हे फीचर देखील दिले आहे. ZV-1F मध्ये व्हिडिओ शुटिंगसाठी टायमर देखील असणार आहे. कॅमेरामध्‍ये फेस प्रायॉरिटी AE शूटिंग करताना आपोआप ब्राईटनेस ऍडजेस्ट होईल. तसेच कॅमेरात डिजिटल स्टॅबिलायझेशन असणार आहे. यामध्ये Eye Auto Focus  देखील असणार आहे. कॅमेरात उत्तम माईक इनपुट देखील देण्यात आला आहे. यामुळे स्पष्ट व्हॉईस रेकॉर्डिंग होऊ शकते.