प्रत्येकजण अडीअडचणींसाठी पैसा लावून ठेवतोच. पण, एखादी अडचण मोठी असली आणि जवळ असलेला सर्व पैसा खर्च झाला तर मग पुन्हा पैसा उभा करायला खूप वनवन होते. त्यावर पर्याय म्हणून बरेच जण पर्सनल लोन (Personal Loan) किंवा गोल्ड लोन (Gold Loan) हा पर्याय निवडतात.
वेळेवर कोणी पैसे देत नाहीत. त्यामुळे बरेच जण गोल्ड गहाण ठेवून पैसे घेतात. तर पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला काहीच गहाण ठेवावे लागत नाही. कारण, पर्सनल लोन हे असुरक्षित लोनमध्ये येते. तर गोल्ड लोन सुरक्षित लोनमध्ये येते. त्यामुळे लोनसाठी आपल्याला गोल्ड गहाण ठेवावे लागते.
याशिवाय तुम्ही पर्सनल लोन घ्यायचा विचार करत असल्यास, तुमचा क्रेडिट स्कोअर चेक केला जातो. तसेच, तुमच्याकडून बरेच कागदपत्रं ही घेण्यात येतात. त्यानंतर तुम्हाला लोन द्यायचे की नाही हे लेंडर्स ठरवतात. पण, गोल्ड लोनसाठी तुम्हाला हे काहीच करण्याची गरज भासत नाही.
Table of contents [Show]
लोनची रक्कम कशी ठरते?
दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे लोनची रक्कम मिळण्याची प्रक्रियाही वेगळी आहे. म्हणजे तुम्ही गोल्ड गहाण ठेवून पैसे घेणार असाल तर तुमच्या गोल्डची शुद्धता चेक करुन तुम्हाला रक्कम दिली जाते. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार गोल्ड लोनद्वारे जास्तीतजास्त लोन टू व्हॅल्यू (LTV) 75 टक्के आहे.
म्हणजेच तुम्ही 1 लाखाचे सोन गहाण ठेवल्यास, त्यावर तुम्हाला 75 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. तर तुम्ही पर्सनल लोन घेणार असाल तर तुम्हाला 20,000 रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत लोन मिळू शकते. पण, त्यासाठी तुमची कर्ज फेडण्याची क्षमता आणि क्रेडिट स्कोअर चेक केल्या जातो.
लोन फेडायची मुदत किती?
गोल्ड लोन फेडण्याची मुदत शक्यतो अल्प मुदतीची असेत. म्हणजेच 6 महिने ते 48 महिन्यांपर्यत असू शकते. त्यात काही लेंडर्स तुम्हाला लवकर लोन फेडण्यासाठी 24 महिने किंवा 36 महिन्यांचा अवधीही देऊ शकतात. तेच पर्सनल लोनसाठी तुम्हाला 12 महिने ते 72 महिने किंवा 6 वर्षाचा अवधी मिळू शकतो.
लोनवर व्याज किती?
गोल्ड लोन हे सुरक्षित प्रकारचे लोन आहे. त्यामुळे तुम्हाला गोल्ड गहाण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हे दर लेंडर्सनुसार वेगळे असू शकतात. त्यातही तुमच्या गोल्डची शुद्धता तपासली जाते. त्यानुसारच व्याजदरही ठरवल्या जातो. सामान्यत: गोल्डवर 9 ते 27 टक्क्यांदरम्यान व्याज घेतले जाते. पर्सनल लोनसाठी व्याजदर वार्षिक 10.5 टक्के ते 24 टक्के आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कमी व्याजदराने लोन मिळू शकते.
कोणता आहे योग्य पर्याय?
आर्थिक अडचणींच्या प्रसंगी या दोन्ही गोष्टी तुमची आर्थिक गरज पूर्ण करु शकतात. मात्र, यापैकी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही दोन्हीपैकी एकाची निवड करणे गरजेचे आहे. तुम्हाला जर जास्त पैशांची गरज असेल तर ते गोल्ड लोनने तुमची गरज भागणार नाही.
यासाठी तुम्हाला पर्सनल लोनसारखे पर्याय निवडणे आवश्यक आहे. पण, त्यासाठी तुमचे सर्व कागदपत्रं तयार आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला त्वरित लोन मिळू शकते. त्यामुळे लोन घेण्याच्याआधी या गोष्टी चेक करुनच लोन घ्या.
तसेच, कमी रकमेची आणि तातडीने पैशांची गरज असेल तर गोल्ड गहान ठेवून तुम्ही त्वरित गोल्ड लोन मिळवू शकता. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार एकाची निवड केल्यास, तुम्ही फायद्यात राहाल.