Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Benefits of Gold Loan: इतर कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी गोल्ड लोनच्या 'या' फायद्यांबद्दल जाणून घ्या

Gold Loan Benefits

Image Source : www.unimoni.in

Benefits of Gold Loan: सध्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर (Personal Loan Interest Rate) हा सर्वात जास्त आहे. असे असताना वैयक्तिक कर्जाऐवजी तुम्ही गोल्ड लोन (Gold Loan) घेऊ शकता. हे कर्ज कमी वेळात आणि कमीत कमी कागदपत्रांसह उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाचे फायदे जाणून घेऊयात.

बऱ्याच वेळा आपल्याला महत्त्वाच्या कामांसाठी कर्ज (Loan) घ्यावे लागते. बँक अर्जदाराचा त्याचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) तपासून कर्ज उपलब्ध करून देते. ज्यावर भरमसाठ व्याजदर आकारला जातो. जर अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर खराब असेल, तर बँक अशा अर्जदाराला कर्ज देण्यास नकार देते. याउलट जर तुमच्याकडे सोनं असेल, तर तुम्ही ते तारण ठेऊन कर्ज घेऊ शकता. गोल्ड लोन घेण्यासाठी अतिशय कमी कागदपत्रं आवश्यक असतात. हे कर्ज सुरक्षित प्रकारात मोडत असून सध्या नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या देखील गोल्ड लोन उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर गोल्ड लोनचे फायदे जाणून घ्या.

कमी व्याजदर आणि कमी शुल्क (Low interest rates and low fees)

तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी कर्जाची आवश्यकता असेल, तर तुम्ही गोल्ड लोनची निवड करू शकता. गोल्ड लोनवर वैयक्तिक कर्जपेक्षा (Personal Loan) कमी व्याजदर आकारला जातो. हा व्याजदर प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असू शकतो.या व्याजदाराची सुरुवात किमान 8 टक्क्यांपासून होते. हे कर्ज मिळवून द्यायला बँकेकडून अगदी कमी शुल्क आकारले जाते.

किमान कागदपत्रांची आवश्यकता (Minimum Document Requirement)

कर्ज घेताना बँकांना वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात. या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्याची तपासणी केली जाते आणि मगच कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र गोल्ड लोन घेताना अगदी कमीत कमी कागदपत्रं सादर करावी लागतात. या कागदपत्रांमध्ये ओळखीचा पुरावा (Proof of Identity) आणि रहिवासी पत्ता (Residential Address) असणारे कागदपत्रं गरजेचे असते. हे कर्ज देताना क्रेडिट स्कोअरचा फारसा विचार केला जात नाही.

फोरक्लोजर शुल्क माफ (Foreclosure fee waived)

तुम्ही घेतलेले गोल्ड लोन हे तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी घेतले असेल, तर 3 महिन्यांनंतर तुम्हाला बँकेकडून फोरक्लोजर शुल्क माफ (Foreclosure fee waived) केले जाते. मात्र तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी लोन क्लोज करताना अगदी कमीत कमी शुल्क भरावे लागते. हे शुल्क प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असते.

सोन्याची सुरक्षा (Gold security)

तुम्हाला गोल्ड लोन हवे असेल, तर तुम्ही बँकेत सोने तारण ठेवून कर्ज मिळवू शकता. याचे दोन फायदे आहे. पहिला फायदा असा की, तुमचे सोने बँकेत लॉकरमध्ये सुरक्षित राहते. तर दुसरा फायदा असा की, तुम्ही घेतलेले कर्ज बँकेला परत केले की तुम्हाला तुमचे सोने परत मिळते.सोन्यामुळे अडचणीच्या परिस्थितीत तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध होते आणि तुमची अडचण सोडवली जाते.

क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्नाचा पुरावा दाखवण्याची गरज नाही (No need to show credit score and proof of income)

कर्ज उपलब्ध करून देताना बँका अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर (credit score) आणि उत्पन्नाचा दाखला पुरावा स्वरूपात मागतात. या कागदपत्रांची पडताळणी झाली की, मगच कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र गोल्ड लोन देताना उत्पन्नाचा दाखला किंवा क्रेडिट स्कोअरची आवश्यकता नसते. तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याच्या आधारे कर्जाची रक्कम निश्चित करण्यात येते.