प्रवासाच्या दृष्टीने काही खास गोष्टींवर नेहमीच लक्ष द्यावे लागते. त्यामुळे बजाज फिनसर्व्हची उपकंपनी असलेल्या बजाज मार्केटच्या रोड ट्रिप कव्हरचा इन्शुरन्स प्लॅन खरेदी केल्यास तुमचे बरेच टेन्शन कमी होऊ शकते. हा प्लॅन खरेदी करण्याचा खर्च फक्त 599 रुपये असून यावर तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत कव्हरेज मिळणार आहे. यासाठी बजाज मार्केटने सीपीपी ग्रुप इंडियासोबत भागीदारी केली आहे.
या प्लॅनद्वारे तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंत अपघात कव्हरेज मिळेल. त्याचबरोबर हॉटेल आणि प्रवासाच्या मदतीसाठी कंपनीने 1 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर इमर्जन्सी मेडिकेल स्थलांतरासाठी रिम्बर्समेंटची सुविधाही यात दिली आहे. तसेच, या प्लॅनमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड ब्लाॅक करण्याच्या सुविधेचाही समावेश केला आहे.
रोड ट्रिप कव्हरच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये 500 लोकेशनवर इमर्जन्सीसाठी मदत आणि इमर्जन्सी निवासासाठी कव्हरेजचा समावेश करण्यात आला आहे. हा प्लॅन तुमच्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये चांगला कव्हरेज देत आहे. त्याचबरोबर इतरही सेवांचा लाभ घेऊन, हा प्लॅन ग्राहकांना त्यांच्या प्रवासाची टेन्शन फ्री पद्धतीने प्लॅनिंग करण्यात मदत करू शकते. ग्राहकांना प्रवास, मदत, आरोग्य, लाईफस्टाईल या कॅटेगरीविषयी जाणून घेता येणार आहे आणि 200+ पाॅकेट इन्शुरन्स प्लॅन पाहू शकणार आहेत. यासाठी ग्राहकांना 3 स्टेप्समध्ये इन्शुरन्स खरेदी करता येणार असून त्यासाठी कमीतकमी कागदपत्रांची गरज भासणार आहे.
प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहक भारतीय नागरिक असायला पाहिजे. ग्राहकाचे वय 18 वर्ष आणि त्यावरील नागरिक या प्लॅनचा लाभ घेऊ शकणार आहेत. तसेच, प्लॅनची मुदत खरेदी केलेल्या दिवसापासून 10 दिवसांपर्यंत असणार आहे. प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला त्यांचे डिटेल्स द्यावे लागणार आहेत. यामध्ये ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आणि पत्त्याचा समावेश असणार आहे. तुम्ही कंपनीच्या वेबसाईटवरून या प्लॅनचा लाभ घेऊ शकता.
बजाज मार्केटविषयी
बजाज मार्केट, बजाज फिनसर्व्हची उपकंपनी आहे. तसेच, बजाज मार्केट भारतातील सर्वात जलद विकसित झालेली फिनटेक कंपनी असून डिजिटले मार्केटमध्ये अनेक वित्तीय प्राॅडक्ट ग्राहकांसाठी आणत आहे. यामध्ये लोन, कार्ड, इन्शुरन्स, गुंतवणूक आणि पेमेंट्स या कॅटेगरीचा समावेश आहे. कंपनीने ग्राहकांचे आर्थिक ध्येय पूर्ण व्हावे यासाठी नावाजलेल्या कंपन्यासोबत भागीदारी केली आहे. कंपनीने सुरूवातीपासूनच मार्केटमध्ये फिनटेक म्हणून मजबूत पाया रोवला आहे.