Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 15 on Blinkit: फक्त 10 मिनिटांत मिळवा Blinkit वरुन Apple iPhone 15, पाहा डिटेल्स

iPhone 15 on Blinkit

Image Source : www.apple.com

तुम्हाला अ‍ॅपलचा iPhone 15 घ्यायचा आहे. तेही रांगेमध्ये उभे न राहता. मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, ब्लिंकिटवरुन तुम्ही iPhone 15 फक्त 10 मिनिटांत घरपोच मागवू शकणार आहात. त्यामुळे तुम्हाला iPhone 15 घेण्यासाठी स्टोअरवर जायची गरज नाही. चला सविस्तर जाणून घेऊया.

कालच म्हणजे 22 सप्टेंबरपासून अ‍ॅपलच्या iPhone 15 ची विक्री भारतात सुरू झाली आहे. बरेच अ‍ॅपल प्रेमी या फोनची वाट पाहून होते. त्यामुळे काल ॲपल रिटेल स्टोअरच्या बाहेर काही नागरिकांनी फोन खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी केली होती. एवढेच नाही तर गुजरात आणि कर्नाटकामधूनही अ‍ॅपल प्रेमी फोन खरेदी करायला आले होते.

 त्यामुळे अ‍ॅपलच्या स्टोअरवरील रांगा कमी करण्यासाठी, ब्लिंकिटने अ‍ॅपलच्या अधिकृत स्टोअर युनिकॉर्नसोबत भागीदारी करून 10 मिनिटांत अ‍ॅपलचा फोन घरपोच डिलीव्हरी देण्याची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता तासनसात वाट पाहायची गरज नाही. सध्या ही सेवा काही शहरांमध्येच सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुण्याचा नंबर आहे. त्यामुळे तुम्ही जर या शहरात असल्यास, या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहात.

10 मिनिटांत मिळणार फोन

ब्लिंकिटचे CEO अलबिंदर ढींडसा यांनी म्हटले आहे की, iPhone 15 फक्त 10 मिनिटांत ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी यावर्षीही युनिकॉर्नसोबत भागीदारी करुन आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी ग्लोबल फर्स्ट आहे आणि आम्हाला आशा आहे की ग्राहकांना यामुळे खूप आंनद झाला असेल. कारण, ऑर्डर केल्यानंतर फक्त 10 मिनिटांत बहुप्रतिक्षित फोन त्यांना मिळणार आहे.

हे माॅडेल्स विक्रीसाठी उपलब्ध

अ‍ॅपल प्रेमींना मार्केटमध्ये Apple iPhone 15 सीरिज 22 सप्टेंबर सकाळी 8 वाजतापासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. यामध्ये 4 माॅडेल्स उपलब्ध आहेत. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे. अ‍ॅपल प्रेमींना हा फोन खिशात हवा आहे. त्यामुळे स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा दिसत आहे. मात्र, ब्लिंकिटच्या या सेवेमुळे नागरिंकाना गर्दीत उभे राहणे टाळता येणार आहे.

एवढ्यात मिळणार iPhone 15 

अ‍ॅपलचा iPhone 15 तुम्हाला  79,900 रुपयांमध्ये घेता येणार असून तो 128 GB स्टोअरेजमध्ये आहे. तर  iPhone 15 Plus 128 GB स्टोअरेजमध्ये 86,900 रुपयांत घेता येणार आहे. तेच तुम्ही जर iPhone 15 Pro घेणार असाल 128 GB स्टोअरेजमध्ये तर त्याची किंमत 1,34,900 इतकी असणार आहे. 

तसेच, iPhone 15 Pro Max 128 GB स्टोअरेजमध्ये 1,59,900 रुपयांमध्ये घेता येणार आहे. याशिवाय तुम्हाला जर स्टोअरेजची साईज वाढून हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.