Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bluesky: माजी 'सीईओ'ने शोधला ट्विटरला पर्याय, Bluesky देणार ट्विटरप्रमाणे हुबेहूब सेवा

Bluesky

Image Source : www.phonearena.com

Bluesky: जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांच्या ताब्यात असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरला एक भक्कम पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनीच ट्विटर प्रमाणेच हुबेहुब सेवा देणारे ब्लूस्काय (Bluesky) हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. ब्लूस्काय हे 28 फेब्रुवारीपासून अॅप स्टोअर्सवर उपलब्ध झाले आहे.

जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांच्या ताब्यात असलेल्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरला एक भक्कम पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनीच ट्विटर प्रमाणेच हुबेहूब सेवा देणारे ब्लूस्काय (Bluesky) हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. ब्लूस्काय हे 28 फेब्रुवारीपासून अॅप स्टोअर्सवर उपलब्ध झाले आहे. (Former Twitter CEO Jack Dorsey launches Twitter rival Bluesky)

ब्लूस्काय हे ट्विटरसारखेच सोशल मिडिया अॅप आहे. ब्लूस्कायचा इंटरफेस ट्विटरसारखाच असून त्यावर 256 शब्द आणि फोटो पोस्ट करता येतील.  ट्विटरप्रमाणे ब्लूस्कायवर अकाउंट ब्लॉक करणे, शेअर आणि म्युट करण्याचे पर्याय आहेत.

अॅपलच्या अॅप स्टोअरवर ब्लूस्काय सध्या प्रायोगित तत्वावर उपलब्ध करण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी रोजी ब्लूस्कायचे अनौपचारिक लॉंचिंग करण्यात आले होते. आतापर्यंत 2000 जणांनी ब्लूस्काय इन्स्टॉल केले आहे.

जॅक डॉर्सी यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये ट्विटरच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता. एलन मस्क यांनी ट्विटरवर मालकी मिळवल्यानंतर जगभरात ट्विटरमधील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते.

ट्विटरची सेवा झाली डाऊन

आज 1 मार्च 2023 रोजी ट्विटरची जगभरातील सेवा डाऊन झाली होती. भारतात दुपारी 3.47 मिनिटांपासून ट्विटर डाऊन झाले होते. याशिवाय अमेरिका, जपान, यूके या देशांमध्ये देखील ट्विटरची सेवा कोलमडल्याचे दिसून आले. नेटिझन्सनी ट्विटर डाऊनबाबत इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन नाराजी व्यक्त केली.