Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Year sale Fraud: न्यू इयर सेलच्या ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावधान! 'या' टिप्स फॉलो करा

New Year sale Fraud

मोबाइलवर किंवा मेलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. अॅमेझॉन, फ्लिककार्ट कंपनीच्या नावाखाली घोटाळेबाज कंपनीकडूनही तुम्हाला संदेश येऊ शकतो. जास्त मोठी ऑफर, डिस्काऊंट देण्याचे अमिष या संदेशात असू शकेल. किंवा एखादे कूपन तुम्हाला मिळेल, असे या संदेशात म्हटले असू शकते.

नवीन वर्षाचे औचित्य साधून अॅपल कंपनी 1 हजार आयपॅड मोफत देत आहे. तुम्हाला जर आयपॅड पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन रजिस्टर करा आणि लॅपटॉप मिळवा. तुमचे मित्र आणि नातेवाई यांनाही हा मेजेस शेअर करा, असे फसवणूक करणारे संदेश तुम्ही अनेक वेळा सोशल मीडियावर पाहिले असतील. मात्र, असे संदेश आणि त्याखाली येणाऱ्या लिंकपासून सावधानता बाळगा. कारण, तुम्ही फसवले जाऊ शकता. अशा लिंक न्यू इयर सेलच्या (New Year sale Fraud) नावाखाली अनेक घोटाळे सुरू असतात. ऑनलाइन शॉपिंगचा यासाठी वापर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही या काळात शॉपिंग करणार असाल तर सावधानता बाळगा. खाली दिलेल्या टीप्स वाचून तुम्ही ऑनलाइन घोटाळ्यापासून वाचू शकता.

कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका

मोबाइलवर किंवा मेलवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट कंपनीच्या नावाखाली घोटाळेबाज कंपनीकडूनही तुम्हाला संदेश येऊ शकतो. जास्त मोठी ऑफर, डिस्काऊंट देण्याचे अमिष या संदेशात असू शकेल. किंवा एखादे कूपन तुम्हाला मिळेल, असे या संदेशात म्हटले असू शकते. मात्र, खात्री केल्याशिवाय तुम्ही कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका. खात्री करण्यासाठी शॉपिंगच्या अधिकृत साइटवर ऑफर आधी चेक करु शकता. त्यानंतरच निर्णय घ्या. 

अधिकृत वेबसाइटवरुनच शॉपिंग करा 

अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ऑफर देण्यात येतात. मात्र, या संधीचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळेबाज खऱ्याखुऱ्या वेबसाइटसारख्या डमी वेबसाइट तयार करतात. ती अगदी अॅमेझॉन, मेशोच्या अधिकृत वेबसाइटसारखीच दिसू शकते. मात्र, ती प्रॉक्सी वेबसाइट असू शकते. या साइटवर जर तुम्ही तुमची वैयक्तिक आणि बँकेची माहिती सबमिट केली तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते. वेबसाइट खरी आहे की खोटी ते तपासण्यासाठी बाऊझरवरील साइटबाबतची माहिती तुम्ही तपासू शकता. 

OTP कोणाशीही शेअर करू नका 

बँकाकडून अनेक वेळा जनजागृती केल्यानंतरही ओटीपीसंबित फसवणूकीचे गुन्हे समोर आले आहेत. अनेक वेळा वयस्कर व्यक्तींना टार्गेट केले जाते. कधीही कोणाशी ओटीपी शेअर करायचा नसतो. जर नवीन वर्षाच्या ऑफरच्या नावाखाली जर तुम्हाला कोणी ओटीपी मागत असेल तर त्याला ओटीपी देऊ नका. तुमच्या मोबाईलवर आलेला अज्ञात ओटीपी तुम्ही शेअर केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात. 

ई-कॉमर्स साइटवर बँक डिटेल्स सेव करणे टाळा

अनेक जण ऑनलाइन शॉपिंग साइटवर बँक खात्याची माहिती सेव करुन ठेवतात. त्यामुळे पुढील वेळा खरेदी करायची असल्यास सोपे होते. मात्र, असे न करता प्रत्येक वेळी तुम्ही बँक डिटेल्स देऊनच खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण जर तुमचे खाते हॅक झाले तर तुमच्या बँक डिटेल्स चोरी होऊ शकतात. कंपनीच्या माहितीवरही सायबर अटॅक होऊ शकतो. अशा वेळी कंपनीही काही करु शकत नाही. 

अधिकृत ऑनलाइन शॉपिंग कंपनीकडून आलेले फोन उचला 

फक्त अधिकृत शॉपिंग कंपनीकडून आलेलेच फोन उचला. अनेक वेळा तुम्ही एखादी वस्तू ऑर्डर केली नसली तरीही तुम्हाला फोन येतात. घरातील कोणीतरी दुसऱ्याने ऑर्डर केली असावी असे समजून तुम्ही फसू शकता. त्यामुळे कुटुंबीयांनाही याबाबत सतर्क करा. परदेशातून न्यू इयरला तुम्हाला गिफ्ट आले आहे, तुम्ही फक्त टॅक्स भरा, अशा आशयाचे खोटे कॉल्स अनेकांना येतात. त्यासाठी फसवणूक करणारे तुमची बेसिक माहिती आधी मिळवतात. जसे की तुमचा व्यवसाय, राहण्याचे ठिकाण, नोकरी, कुटुंबाची माहिती, वय, फेसबुकवरील वैयक्तिक माहिती. या माहितीच्या आधारे तुमची फसवणूक होऊ शकते.