Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

KYC Update न करणे पडले महागात, सायबर चोरांनी NRI नागरिकाचे बँक खाते केले रिकामे

KYC Update

केवायसीद्वारे मोबाईल क्रमांकाशी बँक खाते लिंक न करणे किती महागात पडू शकते, याचा अनुभव एका NRI व्यक्तीला आला आहे. या व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरांनी तब्बल 57 लाख रुपये लंपास केले आहेत.

तुम्ही तुमचे केवायसी अपडेट करणे का गरजेचे आहे हे तुम्हांला या बातमीवरून समजेल. केवायसी म्हणजेच Know Your Customer. तुम्ही वेळोवेळी बँकेला तुमच्या पत्त्याविषयी, मोबाईल फोन विषयी माहिती देणे आवश्यक आहे.

केवायसीद्वारे मोबाईल क्रमांकाशी बँक खाते लिंक न करणे किती महागात पडू शकते, याचा अनुभव एका NRI व्यक्तीला आला आहे. या व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरांनी तब्बल 57 लाख रुपये लंपास केले आहेत.

काय आहे प्रकरण?

ब्रिटनमधील एका अनिवासी भारतीयाच्या खात्यातून भारतातील सायबर चोरांनी तब्बल 57 लाख रुपये लंपास केले आहेत. लुधियाना पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटकही केली आहे. सदर NRI व्यक्ती ब्रिटनमध्ये राहत होती आणी त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर बँकेत अपडेट केला नव्हता. बँकेत त्यांच्या खात्याशी संलग्न असलेला मोबाईल फोन कुणी तरी दुसरी व्यक्ती वापरत असल्याचे सायबर चोरांना आढळले आणि त्यांनी मोबाईल नंबर आणि ओटीपीद्वारे NRI व्यक्तीच्या खात्यातून पैसे लंपास केले. खात्यातून पैसे काढले गेल्याचे या व्यक्तीला फार नंतर समजले.

सदर व्यक्तीने वेळीच आपला चालू नंबर KYC अपडेट करताना बँकेला दिला असता तर हा प्रकार टाळता आला असता.

कशी केली फसवणूक?

अटक केलेले आरोपी लुधियाना आणि आसपासच्या गावातील अनिवासी भारतीय नागरिकांची माहिती गोळा करत होते. अनिवासी भारतीयांच्या शेजारील कुटुंबियांकडून बँक अधिकारी आहे असे सांगून त्यांचे तपशील घेत होते. त्यानंतर बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल फोन सध्या कोण वापरत आहे याचा तपास करत होते.

सदर व्यक्तीला नोकरीचा बहाणा देऊन या सायबर ठगांनी सिमकार्ड ट्रान्सफर करण्यास सांगितले. या ठगांनी हा नंबर स्वतःच्या नावावर करून घेतला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या मदतीने, सायबर चोरांनी  NRI व्यक्तीचे इंटरनेट बँकिंग खाते हॅक केले आणि ई-मेल आयडी देखील बदलला. यानंतर त्यांनी बँकेकडून डेबिट कार्डही मागवले.

57 लाख केले लंपास!

हे सगळे केल्यानंतर आता NRI व्यक्तीच्या बँक खात्याचा सगळा व्यवहार सायबर चोरांना करता येत होता. त्यांना डेबिट कार्ड प्राप्त होताच त्यांनी बँक खात्यातून तब्बल 57 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले.

NRI व्यक्तीने जेव्हा बँकेशी संपर्क केला तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तत्काळ याबाबत पोलीस फिर्याद नोंदवली आणि सिम कार्ड स्वतःच्या नावावर करून घेणाऱ्या सायबर चोराचा तपास केला. यात लुधियाना पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 17.35 लाख रुपये मिळवले आहे. तसेच ज्या खात्यांवर लंपास केलेली रक्कम जमा केली आहे ते खाते गोठवण्यात आले आहेत.