Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Card Scam: आधारकार्डच्या नवीन स्कॅमपासून राहा सावध! खाते रिकामे होण्यापूर्वी घ्या काळजी

Aadhar Card Scam

Image Source : www.dynamsoft.com

Aadhar Card Scam: आर्थिक फसवणुकीचे नवनवीन स्कॅम मार्केटमध्ये येत असतात. सध्या आधार सक्षम पेमेंट सिस्टममधील (Aadhar Enabled Payment System) काही पळवाटांद्वारे ग्राहकांच्या बँक खात्यातून विना ओटीपी पैसे ट्रान्सफर केले जात आहेत.

Aadhar Card Scam: आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांकडून लोकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केली जात आहे. सध्या मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आला असून, या स्कॅमद्वारे ग्राहकांच्या बँक खात्यातून विना ओटीपी पैसे ट्रान्सफर होत असल्याचे दिसून येत आहे.

आधार सक्षम पेमेंट सिस्टममधील (Aadhar enable Payment System-AePS) पळवाटांचा उपयोग करून हा स्कॅम केला जात आहे. आतापर्यंत दिसून आलेल्या स्कॅममध्ये ओटीपीचा वापर करून पैसे खात्यातून काढून घेतलेल्या घटना घडल्या होत्या. पण या नवीन स्कॅममध्ये खातेधारकाला कोणताही ओटीपी न येता त्याच्या खात्यातून पैसे काढून घेतले जात आहेत.काही प्रकरणांमध्ये तर बँकेतून पैसे काढून घेतल्यानंतरही बँकेचा मॅसेज येत नाही. त्यामुळे खातेधारकाला बँक स्टेटमेंट चेक केल्याशिवाय बँकेतून पैसे काढल्याचे कळतच नाही.

नवीन स्कॅमची कार्यपद्धती काय?

आधारबेस या नवीन स्कॅममध्ये आधार सक्षम पेमेंट सिस्टमचा वापर केला जात आहे. यामध्ये सायबर फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती आधारकार्डला जोडलेल्या बोटांच्या ठशांचा उपयोग करून पैसे चोरत आहेत. स्मार्टफोन आणि स्कॅनरच्या जमान्यात कोणाच्याही बोटांचे ठसे मिळवणे अवघड नाही. नेमका याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार आधारकार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत आहेत.

आधार बायोमॅट्रिक लॉक करा!

अशा स्कॅमपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आधारकार्ड धारकांनी त्यांचे आधार बायोमॅट्रिक माहिती लॉक केली पाहिजे. UIDAI वेबसाईट आणि mAadhaar App चा उपयोग करून बायोमॅट्रिक माहिती लॉक करता येते. सध्या आधारकार्ड धारकांची बायोमॅट्रिक माहिती अनलॉक आहे. त्याचाच गुन्हेगार फायदा घेत असून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. mAadhaar Appच्या मदतीने तुमची आधारकार्डमधील बायोमॅट्रिक माहिती पुढीलप्रमाणे लॉक करा.

  • सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरमधून mAadhaar App डाऊनलोड करा.
  • अ‍ॅप ओपन करून लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर प्रोफाईलमध्ये जाऊन मेनू या पर्यायावर क्लिक करा.
  • मेनूमध्ये 'बायोमॅट्रिक सेटिंग'मध्ये 'Enable Biometric Lock' या पर्यायावर क्लिक करून ओके करा.
  • आता आधारशी संलग्नित असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. तो टाकून व्हेरिफाय करा.
  • तुमची आधार बायोमॅट्रिक माहिती लगेच लॉक होणार.