Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ericsson report : जगभरात सर्वात जलदगतीने भारतात वाढणार 5G ची बाजारपेठ

5G Network

भारतात 5G सेवा वापरणाऱ्या मोबाईल धारकांची (Mobile Users) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात 5G च्या जागतिक बाजारपेठेत भारत अव्वलस्थांनी असेल असा अंदाज एरिक्सन मोबिलिटीने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 5G तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जगभरात 5G तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहेत. कम्युनिकेशन (Communication ) क्षेत्रातील सेवा देणाऱ्या अनेक कंपन्यांनी आता 5G मध्ये गुतंवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये भारत देखील मागे नाही. भारतात 5G सेवा वापरणाऱ्या मोबाईलधारकांची (Mobile Users) संख्यादेखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात 5G च्या जागतिक बाजारपेठेत भारत अव्वलस्थांनी असेल, असा अंदाज एरिक्सन मोबिलिटीने आपल्या अहवालात (Ericsson mobility report 2023) व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 5G तंत्रज्ञानाच्या बाजारपेठेत येत्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. आज आपण 5G संदर्भात एरिक्सनने दिलेल्या अहवालात नेमके काय म्हटले आहे, ते जाणून घेऊया..

सर्वाधिक वेगाने वाढणारी 5G बाजारपेठ- 5G market in India

भारतातील प्रमुख दूरसंचार सर्विस देणाऱ्या कंपन्यांनी 5G नेटवर्कची सुविधा देण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. देशात 2022 अखेरीपर्यंत 5G नेटवर्क वापरणारे जवळपास 1 कोटी ग्राहक होते. दरम्यान एरिक्सन मोबिलिटीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2028 पर्यंत भारतात 57% यूजर्स म्हणजेच सुमारे 70 कोटी यूजर्स 5G नेटवर्कचा वापर करतील असा अंदाज वर्तवला आहे. तसेच भारत जगभरात सर्वात वेगाने 5G ची बाजारपेठ वाढणारा देश ठरेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

4G युजर्सची संख्या घटणार

भारतात ऑक्टोबर 2022 च्या सुरुवातीस तत्काळ 5G नेटवर्कची सेवा उपलब्ध करून देणे, अनेक शहरामध्ये आकर्षक किंमतीत 5Gची सेवा सुरू झाली. त्याच बरोबर परवडणाऱ्या किमतीत 5G चे स्मार्टफोन उपलब्ध झाल्यामुळे  5G सबस्क्रिप्शन झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, 4Gची सेवा सुरूच आहे. मात्र, 2022 मध्ये असलेले 82 कोटी युजर्सची संख्या कमी होऊन 2028 पर्यंत 50 कोटीवर येईल. याचबरोबर भारतात 2028 पर्यंत एकूण मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 1.2 अब्ज पर्यंत वाढेल असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

जगभरात 5G वापरामध्ये झपाट्याने वाढ Globally 5G mobile subscriptions

एरिक्सन मोबिलिटी रिपोर्टच्या जून 2023 च्या अहवालात नमूद केले आहे की, काही देशांमध्ये अस्थिरतेची (युद्धजन्य परिस्थिती, दिवाळखोरी) आव्हाने आणि आर्थिक मंदी असतानाही दूरसंचार कंपन्या 5G मध्ये गुंतवणूक करत आहेत. जगभरात 5G सबस्क्रिप्शन झपाट्याने वाढत आहेत. जागतिक स्तरावर, 2023 च्या अखेरीस हा आकडा 1.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 

दूरसंचार कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ- Revenue rising for service providers

या अहवालानुसार दूरसंचार क्षेत्रातील 5G नेटवर्कची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 5G नेटवर्कचे जगभरात एक अब्जाहून अधिक ग्राहक आहेत. यामुळे 5G मार्केटमध्ये कार्यरत कंपन्यांचा महसुलात गेल्या दोन वर्षांत 7 टक्के वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर, सुमारे 240 कम्युनिकेशन सर्व्हिस प्रोव्हायडर (CSPs) कंपन्यांनी आतापर्यंत 5G ची व्यावसायिक सेवा सुरू केली आहे.

स्मार्टफोनचे मार्केट 5G साठी अडथळा नाही smartphone market

2022 च्या चौथ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये घसरण  झाल्याचे पहायला मिळाले होते. 2023 च्या पहिल्या तिमाहित देखील मार्केटमध्ये तेजी दिसून आली नाही. जागतिक पातळीवर स्मार्टफोनची शिपमेंट 13 टक्क्यांनी घसरली आहे. मात्र याचा 5G च्या सेवा वापरावर फारसा परिणाम होणार नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तसेच 2023 मध्ये 870 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन मॉडेल लॉन्च करण्यात आले असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महिन्याला 20GB डेटाचा वापर  Monthly smartphone data Usage

जगातील 240 कम्युनिकेशन सेवा देणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्या आहेत. तसेच 100 पेक्षा जास्त कंपन्या 5Gची वायरलेस सेवा देत आहेत. दरम्यान, मागील 2 वर्षात मोबाईल डेटा नेटवर्क ट्रॅफिकमध्ये 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023 अखेर पर्यंत जागतिक स्तरावर स्मार्टफोन डेटाचा वापर सरासरी 20 GB पेक्षा जास्त होईल, असा अंदाजही या अहवालातून मांडण्यात आला आहे.