शेअर मार्केटमध्ये या आठवड्यात आणखी काही कंपन्याचे आयपीओ (IPO) येत आहेत. यामध्ये TPG या खासगी कंपनीची भागीदारी असलेली आणि वायर्स आणि केबल्स उत्पादने तयार करणाऱ्या आर आर केबल (RR Kabel) या कंपनीचा आयपीओ 13 सप्टेंबरला ग्राहकांसाठी ओपन होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 1693 कोटी रुपये उभे करणार आहे.
आरआर केबल आयपीओ-
RR kabel ही कंपनी इलेक्ट्रिकल प्रोडक्ट तयार करते. या कंपनीचा आयपीओ 13 सप्टेंबरला बाजारात गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 15 सप्टेंबर पर्यंत तो ग्राहकांना खरेदीसाठी खुला राहणार आहे. या आयपीओच्या एका शेअर्सची किंमत 983 ते 1035 च्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. दरम्यान, संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 12 सप्टेंबरला खुला होईल. दरम्यान, या आपीओचा एक लॉट 14 शेअर्सचा आहे. गुंतवणूकदारांना किमान 14 शेअर्स खेरदीसाठी 14,490 रुपये आणि जास्तीत जास्त 182 शेअर्स खरेदीसाठी 1,88,370 रुपये गुंतवावे लागणार आहेत.
26 सप्टेंबरला लिस्टींग
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तब्बल 10.8 कोटी रुपयांचे शेअर्स राखून ठेवले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रति शेअर्समध्ये 98 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. दरम्यान कंपनीचा हा शेअर 26 सप्टेंबर रोजी लिस्टींग होणार आहे. तत्पूर्वी 25 सप्टेंबरपर्यंत पात् खरेदीदारांचे शेअर्स त्यांच्या डिमॅट खात्यात जमा केले जाणार आहेत. तसेच 22 सप्टेंबरपर्यंत अपात्र गुंतवणूकदारांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
136 कोटींचे कर्ज फेडणार
कंपनी या आयपीओतून मिळालेला निधी 136 कोटी रुपये बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्ण किंवा अंशतः कमी करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, आरआर केबलच्या आयपीओसोबत शेअर बाजारात याच आठवड्यात समही हॉटेल्स, झॅगल प्रीपेड ओशिएन सर्व्हिस आणि चावडा इन्फ्रा या कंपन्यांचे देखील आयपीओ ओपन होणार आहेत.