जर तुमचे पॅनकार्ड हरवले असेल तर तुम्हाला आयकर विभागाकडून डुप्लिकेट पॅनकार्ड काढता येते. पॅनकार्ड हरवणे किंवा खराब झाल्यास डुप्लिकेट पॅनकार्ड मिळवता येते. आयकर विभागाने डुप्लिकेट पॅनकार्डची सुविधा ऑनलाईन केली आहे.
भारतात पॅनकार्ड हे महत्वाचे ओळखपत्र मानले जाते. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे पॅनकार्ड केवळ आर्थिक व्यवहारांनापुरताच मर्यादित नाही. ते एक महत्वाचे ओळखपत्र आणि ओळखीचा पुरवा म्हणून मानला जातो. ज्यात पॅनकार्डधारकाला एक स्वतंत्र क्रमांक भारत सरकारकडून दिला जातो.
जेव्हा पॅनकार्ड क्रमांक तयार होता तो सर्वसाधारणपणे आयुष्यभरासाठी असतो. मात्र या दरम्यान पॅनकार्ड हरवल्यास किंवा ते खराब झाल्यास पॅनकार्डधारकाला डुप्लिकेट पॅनकार्ड प्राप्त करता येते. यासाठी आयकर विभागाने डुप्लिकेट पॅनकार्डची सुविधा उपलब्ध केली आहे.
डुप्लिकेट पॅनकार्ड तुम्हाला ऑनलाईन अर्ज करुन मिळवता येईल. यासाठी एनएसडीएलच्या वेबसाईटवरुन हा अर्ज करता येऊ शकतो. UTIITSL आणि NSDL या दोन वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.
डुप्लिकेट पॅनकार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला जुना पॅनकार्ड क्रमांक सादर करावा लागतो. त्याचबरोबर जर पॅनकार्ड हरवले असेल किंवा चोरीला गेले असेल तर तुम्हाला पोलीसात रितरस तक्रार करावी लागते. पॅनकार्ड हरवल्याची एफआयआर कॉपी ऑनलाईन डुप्लिकेट पॅनकार्डसाठी अर्ज करताना सादर करावी लागते.
डुप्लिकेट पॅनकार्डसाठी भारतीय नागरिकांना 110 रुपये शुल्क भरावे लागते. अनिवासी भारतीयांसाठी हे शुल्क 1020 रुपये इतके आहे. डुप्लिकेट पॅनकार्ड तुमच्या राहण्याच्या ठिकाणी पोस्टाने पाठवले जाते.