Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँकेच्या अ‍ॅपमधील या सुविधा तुम्हाला माहित आहेत का?

bank banking app

आपल्या ग्राहकांचा वेळ वाचण्यासाठी बँकेने अ‍ॅप तयार केले आहेत. एका ठिकाणी बसून बँकेच्या वेगवेगळ्या सोइ-सुविधा बँकेच्या अ‍ॅपवर पाहता येतात.

भारतातील कुठल्याही बॅंकेत आपलं सेव्हिंग अकाऊंट असेल तर त्याचे व्यवहार बॅंकेच्या अ‍ॅप App मार्फत करण्याची सुविधा बॅंका देत असतात. मात्र बॅंका आजकाल आपल्या अ‍ॅप (App) मध्ये केवळ बेसिक सुविधा देऊन थांबत नाहीत. तर त्या जोडीला अनेक सुविधा एकत्र देत आहेत. बहुतांश सुविधा या बॅंकानी स्वतः दिलेल्या असतात. प्रत्येक बॅंकेलच्या अ‍ॅपमधील सुविधा या वेगवेगळ्या असतात. यातील काही मोजक्या सुविधांची माहिती पाहूया. 

सेव्हिंग अकाउंट मॅनेजमेंट - (Savings account management) 

बँकेच्या अ‍ॅपमध्ये आपल्या सेव्हिंग अकाऊंटबद्दल बरीचशी माहिती मिळते, जसे की  सध्या खात्यात किती रक्कम आहे. शेवटचे किती व्यवहार (ट्रांझॅक्शन) झाले हे ऑनलाइन पाहता येतं. केवायसीबद्दल (KYC) माहिती पाहता येते. त्याशिवाय अकाऊंटशी संबंधित विविध सेवा - जसं नवं चेकबुक मागवणं इत्यादींसाठीची मागणी आपण अ‍ॅपवरूनच नोंदवू शकतो. त्याचप्रमाणे फिक्स डिपॉझिट (FD) अशा गुंतवणुकीच्या माहितीसाठी आपल्याला बँक शाखेत जाण्याऐवजी संबंधित माहिती आपण अ‍ॅपवर पाहू शकतो. त्याचप्रमाणे अकाऊंटबद्दलच्या, संपर्काच्या सर्व नाही, मात्र काही व्यवहारामध्ये झाला असेल तर ते अपडेट करण्याची सुविधाही काही बॅंका अ‍ॅपवर देतात. 

पैसे पाठवणे, बिल भरणे - (Fund transfer, Bill payment)

इतर कुणालाही पैसे पाठवण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये  उपलब्ध आहे. सहसा NEFT, IMPS आणि अलीकडच्या काळात UPI पेमेंट सेवा अशा तीन मार्गांनी अकाऊंट टू - अकाऊंट पेमेंट करण्याची सुविधा दिली जाते. तसेच दर महिन्याला भरण्यात येणाऱ्या बिलांसाठी बिल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बॅंकांच्या अ‍ॅपमध्ये एकदा संबंधित सेवेचे डिटेल्स भरून ठेवायचे. मग तो वीज मीटरचा क्रमांक असो की, मोबाईलचा पोस्टपेड नंबर असो की गॅस सिलिंडरचे बुकींग असो. एकदा त्यात डिटेल्स भरले की, दरवेळी बिल भरण्यासाठी ते डिटेल्स भरावे लागत नाहीत.

कार्ड मॅनेजमेंट (Card Management) 

बॅंकेकडून घेतलेले डेबिट कार्ड असो की क्रेडिट कार्ड, त्या संदर्भातील बहुतांश सेवा आता अ‍ॅपवर उपलब्ध आहेत. यात कार्डचे पीन बदलणे, कार्डवरून खर्चाची मर्यादा (लिमिट) सेट करणे आदी गोष्टी करता येतात. कार्ड गहाळ झालं तर ते ब्लॉक करण्यासंबंधी सूचनांसाठीही अ‍ॅप वापरता येतं का, हे पाहावं म्हणजे आणिबाणीच्या वेळी त्याचा उपयोग होऊ शकेल.

लोन मॅनेजमेंट (Loans Management) 

आपण कुठलेही वयक्तिक कर्ज (personal loans) घेतलं असेल किंवा घ्यायचं असेल तर त्यासंदर्भात काही सेवा बॅंकेच्या अ‍ॅपवर उपलब्ध असतात. कर्जाचे हप्ते (instalments) भरण्यासाठी ऑटो डेबिट  (Auto Debit )  सारख्या सुविधा, पुढच्या हप्त्याची तारीख किंवा कर्जाची रक्कम इत्यादीबद्दल डिटेल्स असो - बरीचशी माहिती त्याचप्रमाणे नव्या लोन ऑफरही (loan offer) अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

गुंतवणूक  (Investment) 

विमा आणि गुंतवणूकविषयक काही सेवाही अ‍ॅपवर दिसू लागल्या आहेत. किसान विकास पत्र (KVP), पेन्शन स्कीममधील (NPS) सहभाग आदी अनेक गोष्टी बॅंकांच्या अ‍ॅपवरून हाताळणे  शक्य झालं आहे. काही बॅंका डीमॅट अकाऊंटसारख्या सेवाही अ‍ॅपवर देताना दिसत आहेत.अशा सगळ्या सुविधा देणाऱ्या बॅंक अ‍ॅपची सुरक्षितता राखणं याकडेही आपण लक्ष ठेवले पाहिजे.

या अ‍ॅपसाठी असलेला पीन किंवा पासवर्ड कुणालाबरोबरही शेअर करू नये. माहिती तंत्रज्ञानाच्या मंचावर आर्थिक व्यवहार पार पाडताना सुरक्षाविषयक उपाययोजना अनुसरणं सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक आहे.