Insurance Company Issue : इन्शुरन्स पाॅलिसी घेतली म्हटल्यावर इन्शुरन्स घेणाऱ्याला कधीतरी इन्शुरन्स कंपनीविषयी एखादी समस्या उद्भवू शकते. यामध्ये क्लेमची प्रोसेस, संपर्क तपशील, नाॅमिनेशन, पाॅलिसी रिन्यूव्हल आणि अजूनही बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागू शकते. एखाद्या वेळी इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारू शकते. मग अशावेळी काय करायचं हा प्रश्न उभा राहतो. तसेच, या प्रकरणाची कुठे तक्रार (Insurance Complaint) करायची? कोणाला भेटायचे? याविषयी काहीच माहिती राहत नाही. तेव्हा गोंधळून जाण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला त्याची कशी तक्रार करायची, हे सांगणार आहोत.
Table of contents [Show]
अशी करा तक्रार
प्रत्येक इन्शुरन्स कंपनीत एक तक्रार निवारण अधिकारी असतो. त्यामुळे सर्वांत आधी तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे मेल पाठवून तक्रार करु शकता. तसेच इन्शुरन्स कंपनीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन रितसर तक्रार नोंदवू शकता. त्यामुळे बऱ्याचशा तक्रारी इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात सुटायला मदत होते. तसेच, तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने 15 दिवसात उत्तर देणे आवश्यक आहे. जर तसे झाले नाही तर तुम्ही आयआरडीएआयच्या (IRDAI) कार्यालयात जाऊन त्या प्रकरणाची तक्रार दाखल करु शकता.
मेल पाठवायची सोय आहे उपलब्ध
तुम्हाला एखादी समस्या आली तर तुम्ही ज्या कंपनीचा इन्शुरन्स घेतला आहे, त्या कंपनीच्या अधिकाऱ्याला मेलद्वारे तक्रार करु शकता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रं देणे तुम्हाला बंधनकारक असेल. त्यामुळे सर्व कागदपत्रांची पीडीएफ करुन तुम्ही तो मेल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्याला करु शकता.
इन्शुरन्स लोकपालाकडे करा तक्रार
तुमच्या तक्रारीचे निवारण झाले नसल्यास तुम्ही इन्शुरन्स लोकपाल कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकता. IRDAI च्या वेबसाईटनुसार सध्या देशात एकूण 17 इन्शुरन्स लोकपाल आहेत. तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहरातील कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवू शकता. ते शक्य नसल्यास तुम्ही मेलद्वारे तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर महत्वाची कागदपत्रं तुम्ही त्यांना पाठवणे आवश्यक आहे.
'IRDAI'ला करा संपर्क
पाॅलिसीधारक तक्रार करण्यासाठी अजून एका पर्यायाचा वापर करु शकतो, तो भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI कडे ही तक्रार नोंदवू शकतो. यासाठी तुम्ही मेलचा वापर करु शकता. तसेच, तुम्ही टोल फ्री नंबरवरुन त्यांच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकता. एकदा तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कंपनीला 15 दिवसात उत्तर देणे बंधनकारक असेल.
त्यामुळे इन्शुरन्स पाॅलिसी घेताना, महत्वाच्या अधिकाऱ्याचे संपर्क क्रमांक आणि ई-मेल घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी तुम्हाला काही विचारायचे असल्यास, त्यांना थेट संपर्क करुन तुमची समस्या त्यांना सांगू शकता. त्यामुळे तुम्हाला इन्शुरन्ससंबंधित समस्या असल्यास त्वरित मदत मिळू शकते.