Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dividend Paying PSU Stock: तुमच्या पोर्टफोलिओत हे स्टॉक्स असतील तर तुमची डिव्हीडंड उत्पन्नाची चिंता मिटून जाईल

Dividends

Dividend Paying PSU Stock: सरकारचे पाठबळ आणि उद्योग क्षेत्रातील भक्कम स्थान यामुळे या कंपन्यांनी कामगिरीत देखील सातत्य राखले आहे. अशाच काही निवडक कंपन्यांचे शेअर्स जर तुमच्या पोर्टफोलिओत असतील तर तुम्हाला डिव्हीडंड उत्पन्नाबाबत चिंता करण्याची गरज नाही.

खासगी कंपन्यांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना नियमित लाभांश देत असल्याचे मागील काही वर्षात दिसून आले आहे. त्यामुळे शेअर बाजार विश्लेषक, म्युच्युअल फंड मॅनेजर्स पीएसयू अर्थात सरकारी कंपन्यांच्या शेअर्सला पहिली पसंती देतात.

सरकारचे पाठबळ आणि उद्योग क्षेत्रातील भक्कम स्थान यामुळे या कंपन्यांनी कामगिरीत देखील सातत्य राखले आहे. अशाच काही निवडक कंपन्यांचे शेअर्स जर तुमच्या पोर्टफोलिओत असतील तर तुम्हाला डिव्हीडंड उत्पन्नाबाबत चिंता करण्याची गरज नाही. वर्षभरात शेअर्समधून अपेक्षित परतावा मिळाला नाही तरी या कंपन्या तुम्हाला डिव्हींडड देऊन तुम्हाला खूश करतील.

सार्वजनिक क्षेत्रातील 9 कंपन्यांचे स्टॉक्स जे डिव्हींडड देण्यात आघाडीवर आहेत, अशा कंपन्यांचा रिपोर्ट नुकताच अॅक्सिस सिक्युरिटीजकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार मागील 12 महिन्यांत या कंपन्यांनी सर्वाधिक डिव्हीडंड दिला आहे. या कामगिरीचा याचा आढावा अॅक्सिस सिक्युरिटीजने अहवालात घेतला आहे.

गुंतवणूकदारांना भरघोस डिव्हीडंड देण्याच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात भरवशाची कंपनी म्हणून कोल इंडियाने आपली स्वतंत्र ओळख तयार केली आहे. मागील 12 महिन्यात कोल इंडियाचा (Coal India) डिव्हीडंड यिल्ड 9% इतका होता.  कोल इंडियाने प्रति शेअर 24.25 रुपयांचा लाभांश दिला होता.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन (Power Grid Corporation) या आणखी एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 14.75 रुपयांचा लाभांश दिला आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचा डिव्हीडंड यिल्ड 7% इतका आहे.नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी (Nalco) या शेअरने गुंतवणूकदारांना मागील 12 महिन्यात 4.5 रुपये प्रति शेअर डिव्हीडंड दिला आहे. नाल्कोचा डिव्हीडंड यिल्ड 5% इतका आहे.

तेल आणि वायू क्षेत्रातील ऑईल इंडिया लिमिटेडने (Oil India Ltd) प्रति शेअर 20 रुपयांचा लाभांश दिला आहे. या कंपनीचा डिव्हीडंड यिल्ड 7% इतका आहे. ऊर्जा क्षेत्रातील आईसी (REC) ही कंपनी देखील डिव्हीडंडमध्ये सातत्या राखणारी सार्वजनिक कंपनी आहे. आरईसीचा डिव्हीडंड यिल्ड 6% इतका असून कंपनीने प्रति शेअर 15.6 रुपये इतका लाभांश दिला आहे.

बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट कंपनी या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपयांचा लाभांश दिला आहे. या कंपनीचा डिव्हीडंड यिल्ड 6% इतका आहे. ओएनजीसी (ONGC) कंपनीचा स्टॉक देखील डिव्हीडंड उत्पन्नासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. ओएनजीसीचा डिव्हीडंड यिल्ड 6% इतका आहे. मागील 12 महिन्यात ओएनजीसीने प्रति शेअर 11.25 रुपयांचा लाभांश दिला आहे.

हुडको (Hudco) या कंपनीने प्रति शेअर 3.85 रुपयांचा लाभांश दिला आहे.हुडकोचा डिव्हीडंड यिल्ड 5% इतका आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपनीने मागील 12 महिन्यात गुंतवणूकदारांना प्रति शेअर 27 रुपयांचा लाभांश अदा केला आहे. चेन्नई पेट्रोलियमचा डिव्हीडंड यिल्ड 5% इतका आहे.

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)