व्हिडिओ इफ्केट्स क्षेत्रातील नामांकित कंपनी डिजीकोर स्टुडिओ लिमिटेड (डिजिकोर) या पुण्यातील कंपनीचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाल आहे. दरम्यान, कंपनीने संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून तब्बल 8,22,16,800 रुपयांची गुंतवणूक प्राप्त केली आहे. डिजीकोर कंपनीने 3 गुंतवणूकदारांना 171 रुपये प्रतिशेअर असे 4,80,800 इक्विटीचे वाटप केले आहे.
30.48 कोटी रुपयांचा निधी उभारणार
व्हिज्युअल ईफेक्टसाठी(vfx) जगभरात नावाजलेल्या पुण्यातील डिजीकोअर स्टुडिओचा (Digikore Studios), आयपीओ आज गुंतणुकीसाठी खुला झाला आहे. दरम्यान या IPO च्या माध्यमातून कंपनी 30.48 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. यासाठी 17,82,400 इक्विटी शेयर उपलब्ध केले आहेत. एकूण इक्विटीमध्ये 12,60,800 इक्विटी फ्रेश इश्यू आहेत. तर 5,21,600 इक्विटी शेयर हे ऑफर फॉर सेल (OFS)साठी आहेत. या आयपीओमध्ये कंपनीने OIB साठी 50% कोटा राखीव ठेवला होता. त्यामाध्यमातून कंपनीने तीन गुंतवणूकदारांकडून 8,22,16,800 निधी प्राप्त केला आहे.
अँकर गुंतवणूकदार
राजस्थान ग्लोबल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 2,45,600 इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले असून 4,19,97,600 रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तसेच सेंट कॅपिटल फंड यांना 2,01,09,600 रुपयांच्या गुंतवणुकीसाठी 1,17,600 इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. तर, LRSD सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड ला 1,17,600 इक्विटी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे. याही कंपनीकडून डिजीकोरने 2,01,09,600 रुपयांची गुंतवणूक प्राप्त केली आहे.
27 सप्टेंबर 2023 पर्यंत खुला
या 'आयपीओ'मध्ये इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी 50 टक्के हिस्सा राखून ठेवण्यात आला आहे. तर 15 टक्के हिस्सा हाई नेट वर्थ असलेल्या व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर उर्वरित 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गुतंवणूकदारांना 27 सप्टेंबर 2023 पर्यंत या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. तसेच कंपनीचे शेअर्स 4 ऑक्टोबर 2023 रोजी NSE वर लिस्ट होण्याची शक्यता आहे. या आयपीओची बँड प्राईस 168 ते 171 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी 800 शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागणार असून एका गुंतवणूकदारास जास्तीत जास्त 2 लॉट घेता येणार आहेत.