Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Demat Account nominee: नॉमिनीची माहिती अपडेट न केल्यास डिमॅट खाते होणार बंद; शेवटची तारीख जवळ, असे करा अॅप्लाय

Demat Account nominee

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खाते अनिवार्य आहे. त्याशिवाय गुंतवणुकदारांना कोणताही व्यवहार करता येत नाही. मात्र, जर तुम्ही सेबीच्या निर्णयांकडे लक्ष देत नसाल तर तुमचे डिमॅट खाते फ्रोजन म्हणजेच बंद होऊ शकते. नॉमिनीची म्हणजेच वारसदाराची माहिती डिमॅट खात्यात अपडेट करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.

Demat Account nominee Update: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी डिमॅट खाते अनिवार्य आहे. त्याशिवाय गुंतवणुकदारांना कोणताही व्यवहार करता येत नाही. मात्र, जर तुम्ही सेबीच्या नोटिफिकेशनकडे लक्ष देत नसाल तर तुमचे डिमॅट खाते फ्रोजन म्हणजेच बंद होऊ शकते. नॉमिनीची म्हणजेच वारसदाराची माहिती डिमॅट खात्यात अपडेट करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. अद्यापही तुम्ही नॉमिनीची माहिती अपडेट केली नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या. अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते. शेअर मार्केटसंबंधित व्यवहार तुम्हाला करता येणार नाहीत.

शेवटची तारीख कधी?

डिमॅट खात्यासाठी नॉमिनी अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. सेक्युरेटी एक्सजेंच बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) नॉमिनी अपडेट करण्याची शेवटची तारीख मार्च 2022 ठेवली होती. मात्र, नंतर त्यामध्ये 1 वर्षाची वाढ करण्यात आली होती. जनतेशी आणि शेअर मार्केटसंबंधित विविध संस्था, संघटनांशी चर्चा केल्यानंतर एक वर्षाची वाढीव मुदत देण्यात आली होती. 

याआधीही जुलै 2021 मध्ये सेबीने सर्व ट्रेडर्स आणि डिमॅट खातेधारकांना नॉमिनीची माहिती अद्ययावत करण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हापासून अद्यापही सर्व खातेधारकांनी माहिती अपडेट केली नाही. जुलै 2021 पूर्वी ज्यांनी नॉमिनीची माहिती अपडेट केली आहे, त्यांच्यासाठी पुन्हा माहिती अपडेट करणे अनिवार्य नाही. म्हणजेच त्यांचे खाते बंद होणार नाही.

जे सध्या डिमॅट खाते वापरत आहेत. मात्र, अद्यापही नॉमिनीची माहिती अपडेट केली नसेल तर त्यांना माहिती अपडेट करावी लागेल. मात्र, जर नॉमिनीची माहिती द्यायची नसेल तर डिमॅट खात्यात जाऊन ऑप्ट आऊट पर्याय निवडावा लागेल. अशा प्रकारे नॉमिनीची माहिती न देताही खाते सुरु ठेवू शकता.  यापुर्वी नॉमिनीची माहिती अपडेट करताना मोबाईल नंबर, इमेल आयडी, ओळखपत्र अनिवार्य होते. मात्र, आता हे वैकल्पिक करण्यात आले आहे. ही माहिती देणे बंधनकारक नाही.

डिमॅट खात्यात नॉमिनी कसा अपडेट कराल? (how to apply for demat nominee)

Step 1: डिमॅट अकाउंटवर लॉग इन करा

Setp 2: प्रोफाइल टॅबमध्ये 'My nominees' हा सेक्शन सर्च करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नॉमिनी डिटेल्स पेजवर जाल. 

Step 3: यामध्ये तुम्ही 'add nominee' किंवा 'opt-out' हे पर्याय निवडू शकता. 

Step 4: नॉमिनीच्या डिटेल्स भरा आणि त्याचा आयडी प्रूफ जोडा. एकापेक्षा जास्त नॉमिनीही जोडू शकता. प्रत्येक नॉमिनीला किती टक्के शेअर द्यायचे, याची माहिती तुम्हाला भरावी लागेल. एकच नॉमिनी असेल तर 100% मात्र, जर एकपेक्षा जास्त नॉमिनी असेल तर तुम्ही किती टक्के द्यायचे हे निवडू शकता. 

Step 5: आधार ओटीपीद्वारे E-sign करा. 

Step 6: सर्व माहिती व्हेरिफिकेशन केली जाईल. त्यानंतर 24 ते 48 तासांत नॉमिनी डिटेल्स खात्यात अपडेट होईल. 

नोट- प्रत्येक डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यानुसार काही स्टेप्स वेगळ्या असू शकतात. 

नव्याने डिमॅट खाते सुरू करणाऱ्यांना नॉमिनी डिटेल्स द्यावी लागेल. मात्र, जर नॉमिनीची माहिती द्यायची नसेल तर त्यासाठी डिक्लेरेशन फॉर्म भरुन द्यावा लागेल. तसेच डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी वारसदाराचे नाव टाकताना साक्षीदाराची गरज असणार नाही. इलेक्ट्रॉनिकली साइन होऊ शकणाऱ्या कागदपत्रांसाठीही साक्षीदाराची गरज नसेल. मात्र, जर खातेधारकाने डिमॅट खाते उघडताना सही ऐवजी अंगठ्याचा ठसा दिला (थंब इंप्रेशन) असेल तर साक्षीदार लागेल.