Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wedding Loan: 'या' 5 कारणांमुळे विवाह कर्जाची मागणी वाढतीये

Wedding Loan

Wedding Loan: भारतात लग्न हा एक सोहळा आहे. हा सोहळा पार पाडण्यासाठी गरज असते ती पैशांची. अलीकडे अनेक बँका वैयक्तिक कर्जा (Personal Loan) अंतर्गत विवाह कर्ज (Wedding Loan) देत आहेत. गेल्या काही वर्षात विवाह कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

लग्न आयुष्यात एकदाच होतं, त्यामुळे प्रत्येकाला हौस-मौस ही करावी वाटतेच. प्रत्येकाला आपलं लग्न थाटामाटात करण्याची इच्छा असते. सुंदर डेकोरेशन, लाइटिंग, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ, बँड-बाजा असं सगळं काही परफेक्ट असावं, असं प्रत्येकाला वाटतं. अनेकांना तर डेस्टिनेशन वेडिंग करायचं असतं. त्यामध्ये थीमही ठरवायची असते. पण लग्नाचं गणित हे पैशाभोवती फिरतं. लोकांच्या याच इच्छा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) अंतर्गत विवाह कर्ज (Wedding Loan) देण्यात येतं.

वैयक्तिक कर्जाचा कल गेल्या काही वर्षात वाढला आहे. लोकं बँकेकडून विवाह कर्ज घेऊन मोठं मोठे लग्नाचे सोहळे पार पाडताना पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ विवाह कर्जाची मागणी वाढत चालली आहे. ही मागणी 5 कारणामुळे सर्वात जास्त वाढतीये. ती कारणं नेमकी कोणती? जाणून घेऊयात.

कोणत्याही सिक्युरिटीची गरज नाही

लग्नासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा एक फायदा म्हणजे त्यात कोणतीही सिक्युरिटी (Security) द्यावी लागत नाही. याचा अर्थ तुमची कोणतीही मालमत्ता धोक्यात न ठेवता तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम बँकेकडून मिळवता येते. याशिवाय इतर कर्जाच्या तुलनेत विवाह कर्जासाठी अर्ज करणे तुलनेने सोपे आहे.

लोन फेडण्याचा कालावधी लवचिक

वैयक्तिक कर्ज परतफेडीचा कालावधी हा बँकेवर अवलंबून असतो. त्यासाठी साधारण 12 महिने ते 84 महिन्यांचा कालावधी देण्यात येतो. असे असले तरीही तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता निश्चित करू शकता. तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न, मासिक खर्च याचा ताळमेळ साधून महिन्याचा हप्ता निश्चित करता येतो. कर्ज घेण्याआधी तुम्ही Personal Loan Calculator चा वापर करू शकता. यामध्ये कर्जाची रक्कम, कालावधी आणि व्याजदर टाकल्यानंतर तुम्ही मासिक हप्त्याचे नियोजन करू शकता आणि वेळेत बँकेच्या कर्जाची परतफेडही करू शकता.

कमीत कमी कागदपत्रं

लग्नासाठी विवाह कर्ज घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेला किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटला (Bank Website) भेट द्यावी लागेल. अर्ज करताना अगदी कमीत कमी कागदपत्रं (Less Document) सादर करावी लागतील. अगदी मोजक्या कागदपत्रांसह बँक तुम्हाला हे कर्ज कमी वेळात उपलब्ध करून देते.

पात्रता निश्चित झाल्यानंतर कर्जाची उपलब्धता

वैयक्तिक कर्ज घेताना कोणतीही सिक्युरिटी लागत नाही. बँक तुम्हाला मोजक्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर कर्ज देऊ करते. इतर कर्जाप्रमाणे तुम्हाला यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागत नाही. यासाठी बँक अर्जदाराचा क्रेडिट स्कोर (Check Credit Score),कर्ज फेडण्याची क्षमता नक्कीच तपासते. महत्त्वाचं म्हणजे या कर्जाला मंजुरी मिळण्यासाठी एक दिवसापेक्षाही कमी काळ लागतो. एकदा का तुमच्या अर्जाला बँकेकडून मंजुरी मिळाली की, रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाते. वैयक्तिक कर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पैसे लगेच उपलब्ध होतात. भारतात लग्न हा एक सोहळा आहे, त्यामुळे त्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा लागतो. वैयक्तिक कर्ज जलद गतीने मिळत असल्याने लग्नासाठी हातात पैसा खेळता राहतो.

गुंतवणूक अचानक बंद करण्याची गरज नाही

काही लोक लग्नासाठी मुदत ठेव (FD) मोडतात किंवा केलेली बचत खर्च (Saving) करतात. तथापि मुदतपूर्तीच्या तारखेपूर्वी मुदत ठेव मोडल्यास दंड आकारला जातो किंवा उत्पन्नाचे नुकसान देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत लग्नासाठी वैयक्तिक कर्ज मदत करते. यामुळे आपली भविष्यासाठी केलेली गुंतवणूकही शाबूत राहते आणि लग्नाचा खर्च हा विवाह कर्जातून पूर्ण होतो.