कंपनी कायद्यानुसार निफ्टीमध्ये लिस्टेड असलेल्या प्रत्येक कंपनीमधील संचालक मंडळावर किमान एक तरी स्वतंत्र महिला संचालक (Independent Women Director) असणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही पाच कंपन्यांनी या कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. नियमांचं उल्लंघन केलेल्या कंपन्यांमध्ये पब्लिक सेक्टरमधल्या तीन कंपन्यांचा समावेश असून 1 राज्य सरकारच्या अखत्यारीतील बँक आहे. एक्सलेन्स अनेबेल्स सर्व्हे ऑन कॉर्पोरेट गव्हर्नन्स या संस्थेच्या सर्व्हेमधून हे उघडकीस आले आहे.
यापूर्वी 2020 साली सहा कंपन्यांमध्ये महिला संचालकांची नियुक्ती केली नव्हती. तर 2021 मध्ये 12 कंपन्यांमध्ये महिला संचालकांची नेमणूक केली नव्हती अशा या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. ज्याप्रमाणे कंपनीची कामगिरी उंचावण्यासाठी मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजर, टिम लिडर अशा महत्त्वाच्या पदांवर महिलांची नेमणुक केली जाते. त्याचप्रमाणे कंपनीच्या प्रगतीच दिशा ठरविण्यासाठी वा कंपनीसमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करणाऱ्या संचालक मंडळावर स्वतंत्र महिला संचालकाची नेमणुक होणे गरजेचे आहे असे मत या सर्व्हेमध्ये नोंदविले आहे.
काय आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स सर्व्हे
सेबीचे माजी चेअरमन एम.दामोधरन यांनी एक्सलेन्स अनेब्लर्स नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फेत कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना कॉर्पोरेट प्रशासन, वातावरण यासंबंधित मार्गदर्शन करत असते. तसेच यासंबंधित विषयावर पाहणी करून अहवाल प्रकाशित करते.
कॉर्पोरेट गव्हर्नन्स सर्व्हेचे स्वरूप
कॉर्पोरेट गव्हर्नन्स सर्व्हेसाठी ही कंपनी निफ्टीमध्ये लिस्टेड असलेल्या 100 कंपन्यांचे वार्षिक अहवाल आणि मॅनिफेस्टो तपासत असते. यामध्ये 12 पब्लिक सेक्टर कंपन्या, 9 बँका आणि 4 विमा कंपन्यांचाही समावेश आहे. या सर्व्हेमध्ये स्त्रि-पुरूष समानते शिवाय विविध वयोगटातील व्यक्तिंना स्थान दिले जाते की नाही तसेच संचालक मंडळाचा कालावधी या विषयावर सुद्धा पाहणी केली जाते.
बदलत्या जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये कंपन्यांच्या संचालक मंडळावर तरुणांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. आर्थिक जनतामध्ये घडणारे बदलांनुसार कंपनीच्या आर्थिक नितीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे संचालक मंडळांमध्ये तरुण संचालक किती आहेत या निष्कर्षावरही पाहणी केली जाते. मार्च 2022 पर्यंत 46 ते 50 वयोवर्षामधील 556 स्वतंत्र संचालक (Independent Directors) होते. तर 89 वर्षाचे सगळ्यात वृद्ध स्वतंत्र संचालक होते. स्वतंत्र संचालकाचे सरासरी वय हे 63.38 आहे.
या पाहणीमधला आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे संचालक मंडळाचा कालावधी. नियमांनुसार स्वतंत्र संचालक मंडळावर एखाद्या व्यक्तिची दोन टर्मसाठीच नेमणूक करता येते. एका टर्ममध्ये जास्तीत जास्त पाच वर्षाचा कालावधी असतो.
मात्र या नियमांचीही काही प्रमाणात पायमल्ली केल्याचे या सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. आर्थिक वर्षे 2022 मध्ये 1 हजार 79 संचालकांचा सरासरी काळ हा कमीत कमी 6.63 वर्षे होते. तर जास्तीत जास्त 53.61 वर्षे होते.