Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

China Smart Phones: चीनी कंपन्यांच्या वर्चस्वाला तडा, गेल्या तिमाहीत चायना स्मार्टफोन्सची मागणी घटली

China Smart Phones & TV Demand Dropped

Image Source : www.oneplus.in/www.buy.realme.com

भारत किंवा जागतिक बाजारपेठांवर चायना स्मार्टफोन्सचा दबदबा पाहायला मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यात हे चित्र झपाट्याने बदललं आहे. चीनी स्मार्टफोन आणि टिव्ही यांची मागणी सातत्याने घटताना पाहायला मिळत आहे.

चीनी स्मार्टफोन कंपन्याचा भारतीय बाजारपेठेवर मजबुत पकड पाहायला मिळते. फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या सॉफ्टवेअर बाजारावर चीनी कंपन्यांची पकड पाहायला मिळते. अनेकदा चीनी कंपन्यांनी सॅमसंग, अॅपल अशा नामांकित कंपन्यांनाही तगडी टक्कर निर्माण केली. चायनीज टीव्हीनेही भारतीय बाजारपेठा काबीज केल्या. आता मात्र चायनीज कंपन्यांना भारत टेलिव्हिजन सेक्टरने मोठा झटका दिला आहे.इंडियन टेलिव्हिजन सेक्टरमध्ये् पहिल्यांदा चीनी ब्रँड टेलिव्हिजनचं मार्केट खाली आलं आहे.
एलजी किंवा सॅमसंग सारख्या मोठ्या ब्रँडने आपल्या टेलिव्हिजनच्या किमती खाली आणल्याने चीनी टिव्ही कंपन्यांना याचा चांगलाच झटका सोसावा लागला आहे. भारतीय बाजारपेठेत चीनी टिव्ही स्वस्त आणि चांगला पर्याय म्हणून उपलब्ध होते. आता मात्र नामांकित कंपन्यांनीच आपल्या उत्पादनांच्या किमती खाली आणल्याने बाजारातल्या विश्वासू पर्यायाकडे ग्राहक पुन्हा एकदा वळले आहेत.

काय आहे कारण?

मार्केट रिसर्च काऊंटरपॉइंट टेक्नॉलॉजीच्या सर्व्हेत याचा खुलासा करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार चायनाचे नामांकित टिव्ही ब्रँडस वनप्लस आणि रिअल मी यांची बाजारातून लवकरच एक्झिट होऊ शकते किंवा या कंपन्या आपलं मार्केट डाऊनसाईझ करू शकतात. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार चायनीज ब्रँडचं टिव्ही शिपमेंट एप्रिल ते जून 2023 या तिमाहित तब्बल 33 टक्क्यांनी कमी झालं आहे.जुलै आणि ऑगस्टमध्येही ही घसरण सुरूच असलेली पाहायला मिळत आहे.एका रिपोर्टनुसार आता ग्राहकांची पसंती सॅनसुई किंवा एसर अशा ब्रँडकडून सँमसंग, एलजी आणि सोनी या कंपन्यांच्या मिड सेगमेंट आणि प्रिमियम मॉडेल्सकडे गेली असल्याचं पाहायला मिळत आहे.

मोबाईल कंपन्यांनाही मिळतोय तगडा झटका

स्मार्टफोनच्या बाजारावर असणारी चीनी मोबाईल कंपन्यांची पकडही आता सैल होताना पाहायला मिळत आहे. एका सर्व्हेनुसार चीनी स्मार्टफोन कंपन्या गेल्या चार तिमाहींपासून सातत्याने बाजारातला आपला शेअर गमावताना पाहायला मिळत आहेत. स्वस्त स्मार्टफोन्सच्या कॅटेगरीत म्हणजेच साधारणपणे १० हजार रुपयांपर्यंतच्या कॅटेगरीत चीनी फोन आपला दबदबा ठेवून होते. आता मात्र चीनी मोबाईल कंपन्यांनी आपलं मार्जिन वाढवण्यासाठी सॅमसंग आणि अॅपलसारख्या मोबाईल कंपन्यांशी स्पर्धा करताना पाहायला मिळत आहेत.मात्र ग्राहकांची पसंती आजही मध्यम श्रेणीतल्या फोनकडे जास्त आहे. त्यामुळे आपली विश्वासार्हता चीनी कंपन्या गमावतायत की काय अशी भीती निर्माण झाली आहे.