Chiku price fall: ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मिरची, आंबा (Chili, Mango) या सारखे फळ ढगाळ वातावरणामुळे गळतीला लागले आहे. ढगाळ म्हणजेच दमट वातावरण असल्याने सीताफळ, चिकू यासारखे फळ नरम पडत असल्याने शेतकरी त्याची तोड करून बाजारात आणत आहे. त्यामुळे चिकूची आवक वाढली आणि दर घसरले आहे. गेल्या आठवड्यात चिकूची आवक वाढली (chiku production Rise), त्याच्या दरात 10 टक्क्याने घसरण दिसून आली आहे, जाणून घेऊया चिकूचे दर किती आहेत?
चिकूचे दर किती? (How much is the price of chiku?)
चिकूच्या दरात 10 टक्क्याने घसरण (Chiku price fall)होऊन चिकू घाऊक बाजारात 5 ते 40 रुपये किलोपर्यंत आला आहे. स्वस्त झाल्याने फळ विक्रेते आणि ज्यूस विक्रेते यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आहे. बाजारात फळांना मागणी असल्याने सर्वच फळांना योग्य दर मिळत असल्याचे दिसून येत आहे. चिकू, पेरू, बोर या सर्व फळांची आवक बाजारात वाढली आहे. थंडी फळांसाठी पोषक असल्याने काही आवक अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ढगाळ वातावरणामुळे नुकसान….. (Damage due to cloudy weather….)
ढगाळ वातावरणामुळे नंदुरबार जिल्ह्यात (In Nandurbar District) मिरचीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट नोंदवली आहे. शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा निघणार नसल्याने शतेकरी चिंतेत आहे. मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मिरचीचे पीक काढून त्याऐवजी हरभरा, गहू या पिकांची लागवड करणार आहे. त्याचबरोबर वातावरणामुळे हापूस आंब्याला सुद्धा फटका बसल्याचे वृत्त आहे.
दरवर्षी फेब्रुवारीत येणारा आंबा… (Mango that comes in February every year…)
अवकाळी पाऊस, धुके, ढगाळ वातावरण यामुळे आंब्याला आलेला मोहोर काळा पडून त्याला गळती लागली आहे. त्याचबरोबर विविध रोग सुद्धा त्यावर पसरत आहे. त्यावर वापरण्यात येणारी फवारणी औषध सुद्धा महागली (Spraying medicine is also expensive) आहे. त्यामुळे यावेळी हापूस आंबा 3 महीने लेट येणार आहे. दरवर्षी फेब्रुवारीत येणारा आंबा मेमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांचे उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे.