Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhaar Card Fraud: आधार नंबरद्वारे बँक खाते हॅक शकते का? काय काळजी घ्यायला हवी?

bank fraud by aadhaar card

Image Source : www.kalingatv.com

बँक खाते उघडताना किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहार करताना आधार कार्ड पुरावा म्हणून सर्सास दिला जातो. हॅकर्सला तुमचा आधार नंबर समजला तर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येतील का? अशा प्रकारचे घोटाळे टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, ते जाणून घ्या.

Aadhaar Card Fraud: आधार कार्ड हे असे सरकारी ओळखपत्र आहे ज्याचा वापर जवळपास सर्वच कामांसाठी अनिवार्य आहे. झेरॉक्स काढण्यासाठी किंवा इतर कामासाठी अनेक जण व्हॉट्सअपद्वारेही आधारकार्डची कॉपी पाठवत असतात. मात्र, हे सुरक्षित नाही. दरम्यान, आधार कार्ड बँक खात्याशीसुद्धा जोडण्यात येते. त्यामुळे जर तुमचा आधार कार्ड एखाद्याला माहिती असेल तर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात का? अशी काळजीयुक्त प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. 

आधार कार्ड बँक खाते लिंक

आता बँकिंग सेवा वापरताना तसेच खाते उघडतानाही आधार कार्डद्वारे तुमची ओळख पटवली जाते. जर तुमचा आधार कार्ड एखाद्या घोटाळेबाजाच्या हाती लागला तर बँक खाते खाली होऊ शकते का? तर याचे उत्तर नाही असे आहे. मात्र, OTP, PIN शेअर करू नका. तसेच कसल्याही प्रकारचे कन्फर्मेशन तुमच्याकडून देऊ नका. फक्त आधार नंबरद्वारे बँक खात्यातून पैसे काढून घेणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बोटांच्या ठशांचा होऊ शकतो गैरवापर 

घोटाळेबाजांनी नवनवीन क्लुप्त्या शोधून काढल्या आहेत. जसे की सरकारी कागदपत्रांवरील बोटांचे ठसे कॉपी करून वापरत आहेत. (Aadhaar Card Fraud) तसेच फेस आयडी, डोळ्यांचे स्कॅन हा आधार सिस्टिममधील डेटा एंजटद्वारे मिळवून बँक खाते साफ करण्यात येत आहेत. त्यामुळे आधारसंबंधित कोणताही माहिती शेअर करताना अलर्ट राहणे हा एकमेव पर्याय आहे. 

खूप वेळ मोबाइल बंद असेल तरी व्हा सतर्क

आधारद्वारे घोटाळा करताना बऱ्याच वेळा मोबाइल सीमकार्डचा देखील वापर केला जातो. सीमकार्ड क्लोन करून वापरले जाते. यावेळात तुमचे सीमकार्ड बंद राहील. नेटवर्कचा इश्यू म्हणून तुम्ही याकडे दुर्लक्षही करू शकता. मात्र, दिल्लीत अशा पद्धतीने सीमकार्ड क्लोन करून आधारकार्डद्वारे एका व्यावसायिकाला लाखो रुपयांना लुटण्यात आले. इमेलवरून आधारद्वारे ओळखपटवण्यासाठी अज्ञान मेल आल्यास परवानगी देऊ नका. असा मेल आधार अथॉरिटीकडे रिपोर्ट करा. 

बँकिंग घोटाळे कशा प्रकारे होतात?

हॅकर्स बँकेचे सर्व्हर हॅक करून पैसे काढून घेतात. किंवा ग्राहकांची माहिती जेथे साठवलेली असते त्या डेटाबेसमधील माहिती चोरी करतात. त्यानंतर नागरिकांना बँकेकडून बोलत असल्याचे भासवून फसवणूक केली जाते. सर्व माहिती या घोटाळेबाजांकडे असल्याने बँकेतून फोन आल्याचा विश्वास नागरिकांना पटतो. मात्र, अशा फोनची खात्री केली पाहिजे. तसेच ओटीपी आणि संवेदनशील माहिती शेअर करू नका.  

आधारवरील बायोमेट्रिक माहिती लॉक करा

तुमच्या नोंदणीकृत मोबाइलद्वारे तुम्ही आधारची बायोमेट्रिक माहिती लॉक करू शकता. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच अनलॉक करता येईल. त्यामुळे घोटाळेबाजांनी जर तुमच्या बोटांचे ठसे चोरण्याचा प्रयत्न केला तर आधारच्या संकेतस्थळावर Error Code -330 येईल. म्हणजेच ऑनलाइन अथाँटिकेशन फेल होईल आणि व्यवहार पूर्ण होणार नाही.