विमा सुगम हे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे राबवले जाणारे वन-स्टॉप इन्शुरन्स प्लॅटफॉर्म असणार आहे. ज्या प्लॅटफॉमद्वारे ग्राहकांना लाईफ आणि इन्सुरन्स पॉलिसींची एकत्रित माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. ही सुविधा ग्राहकांना 1 ऑगस्टपासून वापरण्यास उपलब्ध होईल, असे म्हटले जाते.
विमा सुगम पोर्टलबाबात यापूर्वीही ईर्डाने 1 जानेवारी, 2023 पासून हे पोर्टल सुरू होईल असे म्हटले होते. पण अद्याप ते सुरू झालेले नाही. आता पुन्हा एकदा विमा सुगम पोर्टलच्या लॉन्चची नवीन तारखी बाहेर पडली आहे. विमा सुगम पोर्टल हे ऑनलाइन मार्केटप्लेस आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
1 ऑगस्टला होणार लॉन्चिंग
इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाला (Insurance Regulatory and Development Authority of India) या इन्शुरन्स एक्सचेंज पोर्टलसाठी मान्यता मिळाली आहे. त्याची रितसर लॉन्चिंग 1 ऑगस्टला होईल, असे म्हटले जात आहे. या पोर्टलमुळे इन्शुरन्स सेक्टरमध्ये बरेच मोठे बदल होणार आहेत. यामुळे पॉलिसीधारकांना इन्शुरन्स विकत घेण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी किंवा क्लेम करण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी जावे लागणार नाही. त्यांना या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील.
सध्या मार्केटमध्ये ज्याप्रमाणे पॉलिसीबझारसारख्या साईट्स आहेत. तसेच एजंट, बँका आणि वैयक्तिक इन्शुरन्स एजंट पॉलिसी काढण्यासाठी ज्या सुविधा देतात. त्याच सुविधा ग्राहकांना विमा सुगम पोर्टलवरून मिळणार आहेत. या पोर्टलवरून ग्राहकांना लाईफ इन्शुरन्ससोबतच मोटार आणि हेल्थ इन्शुरन्स देखील खरेदी करता येणार आहे. या पोर्टलवरून पॉलिसी खरेदी करणार्या पॉलिसीधारकांना विविध फायद्यांचा लाभदेखील घेता येणार आहे.
विमा सुगम पोर्टलचा उद्देश
- नागरिकांना पॉलिसी खरेदी करण्यापासून दावा करण्याची प्रक्रिया अशी संपूर्ण सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देणे
- पॉलिसी खरेदी-विक्रीसाठी एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे.
- एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या पॉलिसी उपलब्ध करून देणे.
- हे पोर्टल ऑनलाईन इन्शुरन्स एक्सचेंज प्लॅटफॉर्म म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवणार आहे.
- सर्वांना परवडणाऱ्या दरात हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
विमा सुगम पोर्टलचे फायदे!
- विमा सुगम पोर्टलवर पॉलिसीधारकांना पॉलिसी खरेदी-विक्रीपासून क्लेम सेटलमेंटपर्यंतची सुविध मिळणार.
- प्रत्येक पॉलिसीधारकासाठी ई-विमा, ई-आयए खाते डीमॅट स्वरूपात उपलब्ध असणार.
- पॉलिसीधारकाच्या इच्छेनुसार सर्व कुटुंबाच्या पॉलिसी एकाच प्लॅटफॉर्म पाहण्याची किंवा जतन करण्याची सुविधा.
- विमा सुगम पोर्टल UIDAI, NSDL, CDSL सोबत लिंक असल्यामुळे केवायसी आणि इतर गोष्टींसाठी सोयीचे ठरणार.
विमा सुगम पोर्टलला केंद्र सरकार आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली आहे. ते ऑगस्ट, 2023 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची नोंदणी अजून सुरू झालेली नाही. पोर्टल अधिकृतरीत्या लॉन्च झाल्यानंतर त्यावर ऑनलाईन अर्ज करता येऊ शकेल.