Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bill Gates In Mumbai: बिल गेट्स यांनी घेतली वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियन अंशुल भट्टची भेट, वाचा 'ब्रिज' गेम आणि प्राईज मनी

Bill Gates

Bill Gates In Mumbai:अंशुल भट्ट याने इटलीत सप्टेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियनशीपचा (World Youth Bridge Championship)किताब जिंकला होता. वयाच्या 13 व्या वर्षी अंशुल वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियन बनून इतिहास रचला होता. बिल गेट्स भारत भेटीवर असून त्यांनी अंशुलची मुंबईत भेट घेतली.

ब्रिज खेळातील वर्ल्ड यूथ चॅम्पियन ठरलेला मुंबईतील अंशुल भट्ट (World Youth Bridge Champion Anshul Bhatt) या विद्यार्थ्याची मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नुकताच सदिच्छा भेट घेतली. ब्रिज गेममधील अंशुलचे डावपेच पाहून प्रभावित झालेल्या गेट्स यांनी या खेळात त्याला सोबत करण्याची इच्छाही या भेटीदरम्यान व्यक्त केली.

अंशुल भट्ट याने इटलीत सप्टेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियनशीपचा (World Youth Bridge Championship) किताब जिंकला होता. वयाच्या 13 व्या वर्षी अंशुलने वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियन बनून इतिहास रचला होता. बिल गेट्स भारत भेटीवर असून त्यांनी अंशुलची मुंबईत भेट घेतली. गेल्या वर्षी विजेता बनल्यानंतर गेट्स यांनी अंशुलचे अभिनंदन केले होते. 


गेट्स यांनी या भेटीची माहिती इन्स्ट्राग्रामवरुन दिली आहे. गेट्स यांनी या भेटीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणातात की अंशुलसोबत चांगली भेट झाली. आम्ही दोघांनी ऑनलाईन ब्रिज खेळताना काय विचार करतो, कसे खेळतो यावर गप्पा मारल्या. खेळात सर्वात तरुण खेळाडू म्हणून खेळताना काय वाटते याविषयी गेट्स यांनी अंशुलकडून जाणून घेतले. गेट्सही ब्रिजगेमचे चाहते आणि खेळाडू आहेत. त्यांनी ब्रिज खेळातील क्लृप्त्या अंशुलकडून जाणून घेतल्या. त्याचबरोबर अंशुलला पार्टरन म्हणून सोबत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

कोण आहे अंशुल भट्ट (Who Is Anshul Bhatt)

अंशुल भट्ट हा मुंबईतील ब्रिज खेळातील खेळाडू आहे. तो धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. सप्टेंबर 2022 मध्ये इटलीत पार पडलेल्या वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियनशीपमध्ये अंशुलने तीन पदकांची कमाई करत वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. 2008 मध्ये अंशुलचा जन्म झाला. ब्रिज गेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा अंशुल हा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियनशीपमध्ये भाग घेणारा तो इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वात कमी वयाचा होता. चॅम्पियन बनून त्याने जगभरातील ब्रिज खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले होते. ब्रिज गेमध्ये जागतिक पातळीवर सर्वोत्तम खेळल्याबद्दल अंशुलला जॉन गेराड यूथ अॅवार्डदेखील मिळालेला आहे.  

वर्ल्ड ब्रिज चॅम्पियनशिपमध्ये बक्षिसाची रक्कम किती (Prize Money in Bridge Game)

  • ब्रिज हा पत्त्यांच्या खेळातील सर्वात आव्हानात्मक आणि कठीण खेळ आहे. 
  • हा खेळ चौघांमध्ये पूर्ण 52 पत्यांसह खेळला जातो. 
  • दोघांच्या दोन जोड्या एकमेकांविरोधात लढतात. 
  • एक डाव जिंकल्यानंतर पार्टनरसोबत करार करावा लागतो. त्यानंतर पुढे पुढे हा खेळ सरकतो. 
  • चॅम्पियनशीपमध्ये जगभरातील कानकोपऱ्यातले स्मार्ट प्लेअर ऑनलाईन एकमेकांविरोधात लढतात.  
  • या खेळात डावपेचांना प्रचंड महत्व आहे. साथीदारासोबत खेळताना संवाद आणि सहकार्य या मूल्यांची कसोटी लागते. 
  • डोक्यात रणनिती आखून तशा प्रकारे प्रत्यक्ष खेळताना उतरणे म्हणजे तल्लख बुद्धीचा कस लागतो. 
  • तरुण विशेषत: विद्यार्थी ब्रिज गेममध्ये इतर वयस्कर खेळाडूंच्या तुलनेत सरस ठरतात. 
  • खेळात डावपेच फसल्यानंतर शांतपणे तोल न ढळता खेळणेसुद्धा तुमच्यातील संयम आणि प्रगल्भतेचे गुण अधोरेखित करते. 
  • युरोपात ब्रिज खेळ शाळेत शिकवला जातो. त्यामुळे ब्रिज गेममध्ये युरोपातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसून येते. 
  • वर्ष 2022 मध्ये पार पडलेल्या वर्ल्ड यूथ ब्रिज चॅम्पियनशीपमध्ये पहिले बक्षिस सुमारे 275000 अमेरिकी डॉलर्स इतके होते.
  • बक्षिसाची रक्कम भारतीय चलनात 2 कोटी 20 लाख रुपये इतके होते.
  • ही रक्कम जसा गेम वाढत जातो तशी वाढत जाते. 5 मिलियन ते 10 मिलियन डॉलर्सपर्यंत देखील वाढत जाते.  
  • वैयक्तिक विजेत्यांना वर्ल्ड ब्रिज फेडरेशनकडून गोल्ड , सिल्व्हर आणि ब्रॉंझ मेडलने गौरवण्यात येते. 
  • ब्रिज खेळाच्या प्रसारासाठी आणि याला खेळाचा दर्जा देण्यासाठी वर्ल्ड ब्रिज फेडरेशन आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहे.