Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI ची मोठी घोषणा, कोणतीही बँक देऊ शकणार RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड

RBI

RBI ने सर्व बँकांना रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच आरबीआयच्या परवानगीने सुरु झालेल्या कुठल्याही बँका त्यांच्या ग्राहकांना RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड सुविधा देऊ शकतात.यासोबतच आरबीआयने ई-रुपी व्हाउचरची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली.

रिझर्व्ह बँकेने आज गुरुवारी 8 जून 2023 जाहीर केलेल्या पतधोरणात रुपे कार्डबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. RBI ने सर्व बँकांना रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच आरबीआयच्या परवानगीने सुरु झालेल्या कुठल्याही बँका त्यांच्या ग्राहकांना RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड सुविधा देऊ शकतात.यासोबतच आरबीआयने ई-रुपी व्हाउचरची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली.

RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्डबद्दल RBI ने घोषणा जरी केली असली तरी याबाबतची सविस्तर नियमावली येत्या काही दिवसांत आरबीआयकडून जाहीर करण्यात येणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत रुपे कार्डचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.

यासोबतच, RuPay डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्डे परदेशात जारी करण्याची आणि भारतासह जागतिक स्तरावर वापरण्याची परवानगी देखील ग्राहकांना दिली जाणार आहे. याचा फायदा करोडो भारतीयांना होणार आहे.

RBI च्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, पेमेंट्स व्हिजन डॉक्युमेंट 2025 (Payments Vision Document 2025) ने आधीच राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर UPI ​​आणि RuPay कार्डचा वापर वाढावा, त्याचा प्रचार आणी प्रसार व्हावा या हेतूने एक रूपरेषा आखली आहे. याचाच एक भाग म्हणून RBI ने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. रुपे कार्डचा जागतिक वापर वाढावा यासाठी भूतान, सिंगापूर, नेपाळ आणि सौदी अरब (UAE) या देशांत को-ब्रँडिंगशिवाय RuPay कार्ड स्वीकारण्याची व्यवस्था RBI कडून करण्यात आली आहे.

RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड कुणाला फायदेशीर?

फॉरेक्स-रुपे कार्ड हे एक प्रकारचे प्रीपेड कार्ड आहे. परदेशात ज्यांना आर्थिक व्यवहार करायचे आहेत अशांसाठी हे कार्ड फायदेशीर आहे. मुख्यत्वे परदेशात शिकणारे विद्यार्थी,फिरण्यासाठी गेलेले प्रवासी, व्यापारी यांना या कार्डचा उपयोग होणार आहे. तुमच्या बँकेचे रूपे कार्ड घेऊन तुम्ही परदेशात देखील आता व्यवहार करू शकणार आहात.

दरम्यान, आरबीआयच्या पतधोरण समितीने एकमताने रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर हा व्याजदर आहे ज्यानुसार RBI इतर बँकांना कर्ज देत असते. ज्याचा थेट परिणाम कर्जदार नागरिकांच्या EMI वर होत असतो. रेपो रेट ‘जैसे थे’ परिस्थितीत राहणार असल्याने कर्जदार नागरिकांचे EMI चे हफ्ते देखील आहे त्याच स्थितीत असणार आहेत.