भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये शुक्रवारी विक्रमी वाढ झाली. तब्बल 13% झालेल्या वाढीमुळे BHEL च्या शेअर्सने 52 आठवड्यातील उच्चांक गाठला आहे. सरकारी कंपनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) या कंपनीकडून BHEL ला तब्बल 15530 कोटी रुपयांची ऑर्ड मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी मार्केट बंद होईपर्यंत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स चे शेअर 136 रुपयांवर व्यवहार करत होते.
एनटीपीसीची ऑर्डर-
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स या कंपनीला NTPC कडून छत्तीसगडमध्ये थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. एनटीपीसीकडून छत्तीसगडमध्ये 800 मेगावॅटचे दोन सुपर क्रिटिकल थर्मल पॉवरचे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. एनटीपीसीच्या (NTPC) या दोन प्रकल्पाची एकूण 15530 कोटी रुपये किमतीची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बोली लावून BHEL ने ही ऑर्डर मिळवली आहे. एनटीपीसीच्या या प्रोजेक्टमध्ये प्रकल्पाचे डिझाईन,बांधकाम, उभारणीसाठी लागणे साहित्य निर्मिती आणि पुरवठा, चाचणी इत्यादी कामांचा समावेश आहे.
52 आठवड्याच्या विक्रमी उच्चांक-
एनटीपीसीच्या ऑर्डर मिळाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये सलग तीन दिवसांपासून वाढ होत आहे. शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स च्या शेअर्समध्ये 13% वाढ झाली आणि शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी 137.10 वर पोहोचला होता. बाजारबंद होण्या अखेर कंपनीच्या शेअर 136.15 रुपयांवर स्थिर होता. दरम्यान, शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे मत आहे.