सध्याच्या घडीला चांगला मोबाईल घ्यायचा असल्यास, 15000 रुपयांच्या वर पैसे मोजावे लागतात. मात्र, अॅमेझाॅनवर तुम्हाला 15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ब्रॅंडेड टीव्ही चांगल्या पिक्चर क्वालिटीसह मिळत आहे. स्मार्ट टीव्ही असल्यामुळे तुम्हाला यात सर्वच सुविधा मिळणार आहे.जसे की, अॅप स्टोअरमध्ये अॅक्सेस, वायफाय, नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफार्मवरून तुम्हाला तुमच्या आवडीचा कंटेंट पाहता येणार आहे.
तसेच, तुम्हाला तुमचा स्मार्टफोन टीव्हीला कनेक्ट करून, तुमच्या कुटुंबीयांसोबत व्हिडिओ, फोटो पाहता येणार आहे. याचबरोबर या स्मार्ट टीव्हीवरून तुम्हाला तुमच्या व्यावसायिक मीटिंग्जचे प्रेझेंटेशनही सादर करता येणार आहे. विशेष म्हणजे, या स्मार्ट टीव्हीमध्ये शैक्षणिक टुल्सचाही समावेश आहे. त्यामुळे मुलांना शैक्षणिक कंटेंटही पाहता येणार आहे. हे टीव्ही घेतल्यास तुम्हाला मनोरंजनासह शैक्षणिक गरजाही भागवता येणार आहेत.
वनप्लस 32 इंची स्मार्ट अॅंड्राईड टीव्ही
वनप्लस त्याच्या चांगल्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. तसेच, वनप्लस 32Y सीरिजचा टीव्ही तुम्ही खरेदी केल्यास तुम्हाला निराश करणार नाही. एचडी रेडी (1366x768) रिझोल्यूशन आणि 60 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह, जबरदस्त व्हीझ्युल प्रदान करते. हे बेजल-लेस डिझाइनचा दावा करते, त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरील सीनचा चांगला अनुभव घेता येणार आहे. या स्मार्ट टीव्हीला 20 वॅट आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ क्रिस्टल इन-बिल्ट आहे. या टीव्हीला विशेष बनवते याचे स्मार्ट फिचर्स. तुमचा वनप्लस फोन तुम्ही या टीव्हीला कनेक्ट करून शकता, त्यामुळे गुगल असिस्टंट आणि प्ले स्टोअरवर तुम्हाला सहज अॅक्सेस मिळणार आहे. याची किंमत ही बजेटात आहे, तुम्ही अॅमेझाॅनवरुन हा टीव्ही 12499 रुपयांमध्ये घेऊ शकणार आहात.
एलजी 32 इंची स्मार्ट एलईडी TV
भारतात 15000 पेक्षा कमी किमतीत सर्वोत्तम स्मार्ट टीव्हीच्या क्षेत्रात, एलजीचा ही नंबर लागतो. या 32 इंची एलईडी स्मार्ट टीव्हीमध्ये एलजीची विशेषता दिसून पडते. एचडी रेडी (1366x768) आणि अॅक्टिव्ह एचडीआरच्या रिझोल्यूशनसह हा टीव्ही समृद्ध आहे. डायनॅमिक कलर एन्हान्सर स्कीनवर निसर्गाचे खरे रंग तुम्हाला अनुभवता येणार आहे. यामध्ये वेब ओएस स्मार्ट टीव्ही, वाय-फाय आणि स्क्रीन मिररिंगचा समावेश आहे. तसेच, याचा स्लिम एलईडी बॅकलाइट मॉड्यूल तुमच्या घरात कुठेही अॅडजस्ट होऊ शकते. हा टीव्ही तुम्हाला अॅमेझाॅनवर 13,190 रुपयांना मिळेल.
सॅमसंग 32 इंच एलईडी स्मार्ट टीव्ही
सॅमसंगची वंडरटेनमेंट सीरिज तुम्हाला चांगला अनुभव देण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे. एचडी रेडी (1366x768), मेगा कॉन्ट्रास्ट आणि PurColor तंत्रज्ञान रिझोल्यूशन, तुम्हाला एका वेगळ्याच रंगांच्या दुनियेत नेऊन सोडणार आहे. या सॅमसंग टीव्हीचा स्लीक आणि स्टायलिश डिझाइन तुमच्या घराला अजून आकर्षक बनवणार आहे. टीव्हीमध्ये काॅम्प्यूटरची कार्यक्षमता, स्कीन शेअरिंग आणि कंटेंट गाईडचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि यूट्यूब सारख्या विविध प्लॅटफॉर्मवरून कंटेंट पाहता येणार आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत अॅमेझाॅनवर 13,990 रुपये आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            