Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best 5G phones : 'या' ब्रॅण्ड्सचे 5G फोन मिळतायेत 20 हजारांत

Best 5G phones : 'या' ब्रॅण्ड्सचे 5G फोन मिळतायेत 20 हजारांत

Image Source : www.beebom.com

तुम्ही जर 5G कनेक्टीव्हीटीवाला फोन घ्यायचा प्लॅन करत असाल तर नुकत्याच लाँच झालेल्या Redmi 12 आणि Galaxy M34 चा फोन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. कारण, चांगल्या क्वाॅलिटीसह हे फोन तुम्हाला 20,000 च्या आत घेता येणार आहेत. यात दुसऱ्याही फोनचा समावेश आहे, चला तर मग त्यांच्या किमती जाणून घेऊया.

सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे फोन 5G कनेक्टीव्हीटीला सपोर्ट करणारेच लाॅंच होत आहेत. मात्र, त्यांच्या किमती जास्त आहेत. पण, तुम्हाला कमी किमतीत चांगली क्वाॅलिटी आणि फिचर्स हवे असल्यास, Redmi 12,  Galaxy M34, Motorola आणि Poco यापैकी एक निवडू शकता. कारण, यांची रेंज खिशाला परवडणारी आहे. तसेच, ऑनलाईन घेत असल्यास, तुम्हाला सवलतही मिळू शकते. त्यामुळे 20,000 रुपयांच्या आत फोन घेण्याचे ठरवत असाल तर हे फोन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. 

Redmi 12 5G

Xiaomi नुकताच Redmi 12 5G फोन लाॅंच केला आहे. जो सध्याच्या स्थितीत सर्वात परवडणाऱ्या फोनमध्ये सामील आहे. तसेच, या फोनला ग्लास बॅक देण्यात आला आहे. त्यामुळे फोनचा लुक अगदीच खुलून दिसत असून हा प्रीमियम फोन सारखाच दिसत आहे. या फोनला क्वालकाॅम स्नॅपड्रॅगन चिपसेट दिला आहे. Redmi 12 5G ला  ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. 

यामुळे या फोनद्वारे तुम्ही दिवसा चांगले फोटू काढू शकता, तर रात्रीच्या वेळी फोटो काढल्यास, क्वालिटीत थोडा फरक जाणवतो. कारण, तुम्ही कमी बजेटमध्ये 5G घेताय म्हटल्यावर, तुम्हाला क्वालिटीला झुकते माप द्यावे लागणार आहे. हा फोन तुम्ही फक्त 11,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकणार आहात.

Galaxy M34

कमी बजेटमध्ये जास्त काळ टिकणारा फोन पाहताय मग तुमच्यासाठी Samsung चा लेटेस्ट M-series मध्ये Galaxy M34 तुमच्यासाठी बेस्ट आहे. या फोनला Exynos 1280 ची चिपसेट आहे. तसेच, फोनला 6,000mAh बॅटरी असल्यामुळे, तुम्हाला वारंवार फोन चार्जिंग करायचे टेन्शन राहणार नाही. तसेच, Galaxy M34 ला 4 वर्षे Android अपडेट्स आणि 5 वर्षांचे सुरक्षा पॅचेस मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 

त्यामुळे या किमतीत मार्केटमध्ये असा फोन मिळणे अवघड आहे. यासाठी ज्यांना त्यांच्या फोनमध्ये अपडेट हवी आहे. त्यांच्यासाठी हा फोन खास आहे. तसेच, ज्यांना चांगला इंटरफेस पाहिजे आहे. ते Samsung चा हा फोन फक्त 18,999 रुपयांपासून घेऊ शकतात. यासाठी बॅंकाकडून देखील ऑफर उपलब्ध आहेत. त्यामुळे याचा वापर करुन तुम्ही पैशांची बचत करू शकता.

Motorola G73

ज्या युझर्सना 5G नेटवर्कची जबरदस्त कनेक्टीव्हीटी हवी आहे त्यांच्यासाठी  Motorola G73 बेस्ट पर्याय आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 930 ची चिपसेट देण्यात आली आहे. तसेच, या फोनला 50MP कॅमेरा आणि 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स बसवण्यात आली आहे. या फोनला 5,000mAh बॅटरी असल्यामुळे, तुम्हाला फोन चार्ज करत राहण्याचे टेन्शन राहणार नाही. फोन बरोबर तुम्हाला चार्जरही मिळणार आहे.

 याची स्टोअरेज स्पेस चांगली असून यात 8GB रॅम आणि 128GB स्टोअरेज असणार आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये जास्त स्टोअरेजवाला फोन पाहिजे असल्यास, तुम्ही Motorola निवडू शकता. कारण, हा फोन तुम्हाला 16,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

Poco X5 Pro

यंदा सुरूलाच लाॅंच झालेला हा फोन जास्त स्टाईलिश नसला तरी, कमी बजेट असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 778 चिपसेट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे Nothing Phone (1) मध्ये ही हीच चिपसेट देण्यात आली आहे. तसेच, 120Hz ची AMOLED स्क्रीन फोनला देण्यात आली आहे.  या फोनला 108MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP मायक्रो सेन्सर आहे. प्रायमरी सेन्सर दिवसा आणि रात्रीही चांगली क्वाॅलिटी प्रदान करते. तुम्ही प्लॅस्टिक बॅक आणि बिट डेटेड प्रोसेसरकडे दूर्लक्ष केले तर हा फोन तुम्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घेऊ शकता. 

Infinix GT 10 Pro

Infinix ने नुकतेच बरेच नवीन मिड-रेंज फोन लाँच केले आहेत, परंतु त्या सर्वातून वेगळा असणारा GT10 प्रो'ची बातच और आहे. हा फोन मोबाईल गेमर्ससाठी डिझाईन केलेला असून फोनला Nothing Phon (1) सारखे ट्रान्सपरंट बॅक पॅनल दिले आहे. या फोनमध्ये डायमेंसिटी 8050 चिपसेट आहे. तसेच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आला आहे. हा फोन XOS 13 वर बेस असून Android 13 सह येतो. तुम्ही सर्वात युनिक फोन शोधत असल्यास, हा फोन तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे. याची किंमत 19,999 रुपये आहे. तुम्ही ऑनलाईन घेत असल्यास, तुम्हाला सवलतही मिळू शकते.