Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ATAL Aawas Scheme : बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी सरकारचे 'अटल आवास योजने'तून अर्थसहाय्य

ATAL Aawas Scheme : बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी सरकारचे 'अटल आवास योजने'तून अर्थसहाय्य

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून राज्य सरकारकडून कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या अधिकृत बांधकाम कामगारास घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात येते. तसेच या योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यास नवीन घर बांधायचे असेल तर, किंवा जुने घर पक्के करण्यासाठी या योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येते.

राज्य सरकारकडून समजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याच प्रमाणे राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी देखील अटल आवास योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारकडून अर्थसहाय्य केले जाते. या योजनेचा सर्वसामान्य बाधकांम कामगाराचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होत आहे. या योजनेचे निकष काय आहेत, बांधकामासाठी किती अर्थसहाय्य केले जाते याचा आढावा आपण जाणून घेऊयात.

2024 पर्यंत कामगारांना घरे-

बांधकाम कारागीर आपल्या कौशल्याच्या जोरावर मोठमोठी घरे, इमारती बांधण्याचे काम करतो. परंतु त्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला असता, तो स्वत:साठी पक्के घर बांधण्यास असमर्थ ठरत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. त्यामुळे राज्य सरकारने या कामगारांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजना (Atal Bandhkam Kamgar Awas Yojana) सुरू केली आहे. ही योजना ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी या योजनेच्या माध्यमातून 2024 पर्यंत सर्व कामरागारांसाठी आवास उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

2 लाख रुपये अर्थसहाय्य-

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून राज्य सरकारकडून कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या अधिकृत बांधकाम कामगारास घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य करण्यात येते. तसेच या योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यास नवीन घर बांधायचे असेल तर त्या घराचे क्षेत्रफळ 269 चौरस फूट इतके असावे. सरकारकडून केवळ 269 चौरस फूट क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2 लाख रुपयांची मदत करण्यात येते.

काय आहेत निकष ?

सरकारच्या या अटल बांधकाम कामगार योजनेचा लाभार्थी होण्यासाठी बांधकाम कारागीर हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच या योजनेसाठी बांधकाम कामगाराची स्वताची जागा उपलब्ध असावी. तसेच त्याची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे एक वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी नोंदणी झालेली असावी. अर्जदार नोंदणीकृत बांधकाम कामगाराने वर्षभरात किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे. या योजनेच्या लाभासाठी अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच या बांधकाम कारागीरांचे स्वत:चे पक्के बांधलेले घर नसावे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे-

• बांधकाम कामगाराचे आधार कार्ड
• त्याच्या मालकीच्या जागेचा 7/12 आणि 8 अ उतारा
• अर्जदाराचे बँक पासबुक झेरॉक्स
• बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असलेले प्रमाणपत्र