Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Asian Games 2023: आशिया क्रीडा स्पर्धेतील गोल्ड मेडल विजेत्यांना सरकार देतं इतक्या रुपयांचे बक्षिस

Prize Money for Medal Winners

Image Source : www.twitter.com

Asian Games 2023: युवक आणि क्रीडा कल्याण मंत्रालयाच्यावतीने आशियाई स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडुंना रोख रकमेची बक्षिस दिली जातात. आतापर्यंत या स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी 100 पदकांची कमाई केली. यात 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे.

Asian Games 2023: देशांतर्गत, देशाबाहेरील आणि जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये देदीप्यमान यश मिळवणाऱ्या खेळाडुंचा संपूर्ण देश गौरव तर करतंच. पण त्याचबरोबर केंद्र सरकारसह वेगवेगळ्या राज्यातील सरकार आपल्या राज्यातील खेळाडुंना भरघोष बक्षिसे जाहीर करतात.

Title पदक विजेत्या खेळाडुंना दिली जाणारे बक्षिस

पंजाब सरकारने दोन महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या नवीन स्पोर्ट्स पॉलिसीनुसार, (Punjab New Sports Policy 2023) ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य (Gold, Silver & Bronze) पदक मिळवणाऱ्या आपल्या राज्यातील खेळाडुंना अनुक्रमे 3 कोटी, 2 कोटी आणि 1 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले. तर केंद्र सरकार ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडुंना अनुक्रमे 75 लाख, 50 लाख आणि 30 रुपयांचे बक्षिस देते.

युवक आणि क्रीडा कल्याण मंत्रालयाने 2019 मध्ये नोटीफिकेशननुसार, आशियाई स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडुंनाही बक्षिस देते. सध्याच्या आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील हांगचौऊ येथे सुरू आहेत. या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी 100 पदकांची कमाई केली. यात 25 सुवर्ण, 35 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या महिला कबड्डी टीमने शंभरावं मेडल मिळवून दिलं आहे.

सुवर्ण पदक विजेत्यांना 30 लाखांचं बक्षिस

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुंना केंद्र सरकारतर्फे 30 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाते. तर रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे 20 आणि 30 लाखांचे बक्षिस दिले जाते. तर टीममध्ये 10 पेक्षा जास्त खेळाडू असतील तर प्रत्येक खेळाडुला 15 लाखाचे बक्षिस दिले जाते. महिला क्रिकेट, नेमबाजी आणि ज्या खेळाडुंनी पदक मिळवले आहे. त्यांना नुकतेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. महिला क्रिकेट संघाला केंद्र सरकारने 2.25 कोटी रुपयांचे बक्षिस दिले.

रायफल शुटिंगमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं

भारताला रायफल शुटिंगमध्ये सर्वाधिक 7 सुवर्ण पदकं मिळाली आहेत. तर अ‍ॅथलेटिक्समध्ये 6, नेमबाजीत 5 आणि स्क्वॉशमध्ये 2 सुवर्ण पदकं मिळाली आहेत. आशियाई स्पर्धांमध्ये महिलांच्या हॉकी संघाने कांस्य पदक मिळवले आहे. या विजयासाठी भारतीय हॉकी असोसिएशनने प्रत्येक खेळाडुला 3 लाखांचे बक्षिस जाहीर केले.