Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Artificial Intelligence च्या मदतीने एका खंडणीखोराने लुटले 1 कोटी रुपये

Artificial Intelligence

Artificial Intelligence च्या मदतीने अमेरिकेमध्ये लहान मुलीचा आवाज क्लोन करून खोट्या अपहरणाची भीती घालून 1 कोटी रूपये वसूल करणाऱ्या आरोपीचा खेळ समोर आला. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Artificial Intelligence हे तंत्रज्ञान आज जगामध्ये धुमाकूळ घालत आहे. यामुळे अनेक क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण बदल घडत आहेत. AI मुळे काय-काय होऊ शकते यावर सर्वत्र चर्चा सुरू असताना AI च्या गैरवापराने घडलेली घटना चांगलीच चर्चेत आली आहे. ही घटना आहे AI च्या मदतीने केलेल्या खोट्या अपहरणाची.

ही घटना घडलीये अमेरिकेतल्या अरिझोना राज्यांत. अरिझोनातल्या जेनिफर डीस्टेफेनो या महिलेला एक फ्रॉड फोन आला. फोन उचलताच तिला तिच्या मुलीचा रडण्याचा आवाज आला आणि लगेच समोरून एक आवाज आला की, मी तुमच्या मुलीचं अपहरण केलं आहे. त्या बदल्यात त्याने 1 कोटीची खंडणी मागितली.

जेनिफर डीस्टेफेनो यांची 15 वर्षाची मुलगी सहलीला गेल्यामुळे जेनिफर यांना हे अपहरण सुद्धा खरं वाटलं. त्या घाबरल्या. मात्र, त्यांनी सहलीच्या आयोजकांना संपर्क साधला आणि विचारपूस केली. तेव्हा त्यांना त्यांची मुलगी ही सुखरूप असल्याचं कळलं.

पण मग अपहरणकर्त्याने फोन वरून ऐकवलेला आवाज कुणाचा होता असा प्रश्न पडला असेल.

अपहरणकर्त्याने  हे आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या सहाय्याने केलं होतं. आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या मदतीने अपहरणकर्त्याने जेनिफर यांच्या मुलीचा आवाज क्लोन करून तो पूर्ण फोन संपेपर्यंत सुरू ठेवला होता. या तंत्रज्ञानाच्या साहय्याने आवाज क्लोनींन इतकं तंतोतंत झालं होतं की जेनिफर यांना तो त्यांच्याच मुलीचा आवाज आहे हे एका टप्प्यापर्यंत पटला सुद्धा. मात्र त्यांनी सावधानता बाळगून चौकशी केल्यामुळे त्या 1 कोटीच्या फसवणुकीपासून वाचल्या.

दरम्यान जेनिफर डीस्टेफेनो यांनी अरिझोना पोलिस स्थानकांमध्ये तक्रार दाखल केली असून याप्रकरणी तपास सुरू आहे.

तर असं हे आर्टिफिशल इंटेलिजन्सचा काही जण चांगला फायदा घेत आहेत तर काही जणांनी गैरफायदा घ्यायला सुरूवात केलीये.