Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Days Sale on Vijay Sales: विजय सेल्सचा अ‍ॅपल डेज सेल! अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांवर अफलातून डील्स

Apple Days on Vijay Sales

Apple Days Sale on Vijay Sales: अ‍ॅपल डेज सेलमध्ये आय फोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, अ‍ॅपल वॉचेस, एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन), प्रोटेक्ट प्लस आणि अन्य अ‍ॅपल अ‍ॅक्सेसरीज अशा विविध अ‍ॅपल उत्पादनांवर एक्सक्लुजिव डील्स आणि डिस्काउंट ऑफर्स करण्यात आले आहेत.

विजय सेल्सने अ‍ॅपल डेज सेलची घोषणा केली आहे. 16 ऑगस्ट 2023 पर्यंत ग्राहकांना अ‍ॅपलच्या सर्व उत्पादनांवर अफलातून डील्स मिळवता येतील. विजय सेल्सच्या 125 हून अधिक रिटेल दुकानांमध्ये तसेच त्यांच्या वेबसाइटवर  आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, अ‍ॅपल वॉचेस, एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन), प्रोटेक्ट प्लस  यासह अ‍ॅक्सेसरीजवर सवलत देण्यात आली आहे. 

अ‍ॅपल डेज सेलमध्ये 128 जीबींचा आयफोन-14 सवलतीसह 69 हजार 900 रुपयांवर उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डवर कॅशबॅकही दिला जाणार आहे. ग्राहकाने पूर्वीचा स्मार्टफोन एक्स्चेंज करण्याचा पर्याय निवडला आणि त्यावर 15000 रुपये एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. 

एचडीएफसी बँक कार्डांवरील कॅशबॅक वजा जाता, आयफोन 14 हा 65 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन 14 प्लस केवळ 75 हजार 949 रुपयांना खरेदी करता येईल. १,१७,९९० एवढ्या प्रारंभिक किंमतीला देऊ केल्या जाणाऱ्या शक्तिशाली आयफोन 14 प्रो ची किंमत 1 लाख 17 हजार 990 रुपये इतकी आहे.आयफोन 14 प्रो मॅक्स 1 लाख 25 हजार 099 रुपये एवढ्या किंमतीला खरेदी करू शकता.आयफोन 13 हा 58 हजार 490 रुपयांपासून उपलब्ध आहे.

या सेलमध्ये एमवन चिप असलेला  मॅकबुक एअर  75 हजार 900 रुपयांना, तर एमटू चिपने युक्त मॅकबुक एअर 1 लाख 1 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. एमटू चिपची शक्ती असलेला मॅकबुक प्रो 1 लाख 11 हजार 900  रुपये एवढ्या प्रारंभिक किमतीला उपलब्ध आहे आणि एमटू प्रो चिप्सने युक्त मॅकबुक प्रो 1 लाख 78 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक कार्डांवर दिला जाणारा 5000 रुपयांचा कॅशबॅक या किमतींमध्ये गृहीत धरण्यात आला आहे.

आयपॅड नाइन्थ जनरेशन 25 हजार 990 रुपयांना, तर आयपॅड टेन्थ जनरेशन 38 हजार 990 एवढ्या प्रारंभिक किंमतीला खरेदी केले जाऊ शकते. आयपॅड एअर फिफ्थ जनरेशन 51 हजार 900 रुपये एवढ्या प्रारंभिक किंमतीला उपलब्ध आहे. आयपॅड प्रोची किंमत 75 हजार 670 रुपयांपासून सुरू होत आहे. या किंमतींमध्ये एचडीएफसी कार्डांवर दिला जाणारा 3000 रुपयांचा कॅशबॅक गृहीत धरला आहे.

विजय सेल्समध्ये खरेदी करण्याचा आणखी एक लाभ म्हणजे मायव्हीएस लॉयल्टी प्रोग्राम होय. विजय सेल्सच्या स्टोअर्स व ई-कॉमर्स वेबसाइटवरून केलेल्या खरेदीवर ग्राहकांना 0.75% लॉयल्टी पॉइंट्स दिले जातात. 

अ‍ॅपल वॉच आणि एअरपॉड्सवर डिस्काउंट

कॅशबॅकच्या माध्यमातून तुम्ही अ‍ॅपल वॉच सवलतीत मिळवू शकता. सीरिज एटमधील अ‍ॅपल वॉचेसची किंमत केवळ 39 हजार 490 रुपयांपासून सुरू होत आहे. अ‍ॅपल वॉच एसईची (सेकंड जनरेशन)  किंमत 25 हजार 900 रुपयांपासून सुरू होत आहे, तर अ‍ॅपल वॉच अल्ट्राची प्रारंभिक किंमत 77 हजार 999 रुपयांपासून सुरू होत आहे. एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) कॅशबॅकसह 22 हजार 990 एवढ्या आकर्षक किंमतीला तुमची प्रतीक्षा करत आहे.