प्राइम लाइट (Prime lite) असा हा एक प्लान आहे. यामध्ये तुम्हाला काही निवडक ऑर्डर्सवर फ्री डिलिव्हरी (Free delivery) आणि प्राइम व्हिडिओवर लिमिटेड अॅक्सेसदेखील मिळणार आहे. म्हणजेच, रेग्युलर प्राइम मेंबरशिपची ही स्वस्त आवृत्ती आहे. यामध्ये तुम्हाला प्राइम मेंबरशिपसारखे काही फायदे दिले जाणार आहेत. मात्र पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला नियमित प्राइम मेंबरशिपशिवाय पर्याय नाही.
Table of contents [Show]
प्राइम लाइट मेंबरशीप किंमत
अॅमेझॉननं या वर्षाच्या सुरुवातीला हे लाइट व्हर्जन निवडक ग्राहकांसाठी सादर केलं होतं. आता ते सर्वच यूझर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या प्लानची किंमत वार्षिक 999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्या तुलनेत रेग्युलर प्राइम मेंबरशिपची किंमत 1,499 रुपये आहे. तुम्हाला प्राइम मेंबरशिपचे काही फायदे 999 रुपयांमध्ये मिळणार आहेत.
अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लान्स
- योजना (1 महिना) – 299
- त्रैमासिक योजना (3 महिने) – 599
- वार्षिक योजना (12 महिने) – 1499
- वार्षिक प्राइम लाइट (12 महिने) – 999
कसं घ्यावं प्राइम लाइट?
प्राइम लाइट अॅन्युअल मेंबरशीप मिळविण्यासाठी, तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि अॅमेझॉन पे बॅलन्सचा वापर करू शकता. भारताबाहेर जारी केलेल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं मेंबरशीप घेता येत नाही. त्याचवेळी व्हर्च्युअल कार्ड किंवा व्हर्च्युअल बँक खातं वापरता येत नाही.
काय आहेत प्राइम लाइटचे फायदे?
रेग्युलर प्राइममध्ये एक दिवसाची मोफत डिलिव्हरी उपलब्ध आहे, तर प्राइम लाइटमध्ये दोन दिवसांची मोफत डिलिव्हरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्हणजेच ऑर्डर दिल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत ऑर्डर पुरवली जाईल. मोफत डिलिव्हरीसाठी किमान ऑर्डरची अट लागू होणार नाही. यावर 25 रुपयांचा कॅशबॅकही मिळेल. जर तुम्ही सकाळची डिलिव्हरी घेतली तर तुम्हाला प्रत्येक वस्तूसाठी 175 रुपये शुल्क द्यावे लागेल.
एका आयडीनं दोन डिव्हाइसेसवर साइन इन
अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅकदेखील मिळणार आहे. प्राइम डे सेलचा अर्ली अॅक्सेसदेखील उपलब्ध असणार आहे. जर आपण प्राइम व्हिडिओबद्दल बोललो, तर तुम्ही प्राइमवर व्हिडिओ आणि चित्रपटदेखील पाहू शकाल. परंतु तुम्ही एका आयडीनं फक्त दोन डिव्हाइसेसवर साइन इन करू शकाल. जाहिरातींसह व्हिडिओ एचडी क्वालिटीमध्ये उपलब्ध असतील.