अॅमेझॉन प्राईम डे सेल येत्या 15 जुलै रोजी सुरु होणार असून प्राईम मेंबर्सना 16 जुलै 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत डिस्काउंटमध्ये वस्तूंची खरेदी करता येईल. प्राईम डे सेलमध्ये जबरदस्त डिस्काउंट ऑफर्स देण्यात आल्या असून वस्तूंचा स्टॉक असेपर्यंत सवलत मिळेल. त्यामुळे प्राईम मेंबर्सना सेल सुरु झाला की शॉपिंगसाठी वस्तूंची लवकरात लवकर निवड करावी लागणार आहे.
अॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये केवळ प्राईम मेबर्स सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी अॅमेझॉनकडून खास सेल आयोजित करण्यात आला आहे. जर तुमच्याकडे प्राईम मेंबरशिप नसेल तर तुम्हाला अॅमेझॉन प्राईम सेलमध्ये सहभागी होता येणार नाही.
अॅमेझॉन प्राईम डे सेल 2023 साठी एसबीआय आणि आयसीआयसीआय या दोन बँकांनी खास ऑफर्स दिल्या आहेत. एसबीआयने क्रेडिट कार्डवर 10% सरसकट डिस्काउंट जाहीर केला आहे. अॅमेझॉन प्राईम सेलमध्ये एसबीआय क्रेडीट कार्डधारकांना खरेदीवर 10% सवलत मिळणार आहे.
आयसीआयसीआय बँकेने डेबिट आणि क्रेडीट कार्डधारकांना 10% सवलत मिळेल. याशिवाय अॅमेझॉन बिझनेस श्रेणीत साईनअप करणाऱ्या ग्राहकांना 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
प्राईम मेंबर्ससाठी या सेलमध्ये डेबिट आणि क्रेडीट कार्डवर नो कॉस्ट ईएमआयची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा बजाज फिनसर्व्ह या कंपनीच्या माध्यमातून मिळणार आहे.
अॅमेझॉन प्राईम डे सेल 2023 मध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन्स, टॅबलेट यांच्यासाठी एक्सचेंज ऑफर्स देखील आहे. ग्राहकांना त्यांच्या पिनकोडनुसार वरील वस्तू एक्सचेंज करण्याची संधी मिळेल. अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या नव्या ग्राहकांना तीन महिने ऑडिबल मेंबरशिप मोफत मिळणार आहे.
स्मार्टफोन्सवर सर्वाधिक ऑफर्स
अॅमेझॉन प्राईम डे सेल 2023 मध्ये स्मार्टफोन्सवर सर्वाधिक सवलती देण्यात आल्या आहेत. या प्राईम डे सेलमध्ये वन प्लस, नोर्ड 3, मोटोरेझर 40 सिरिज अशी नवीन 7 मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. सॅमसंग, आयफोन्स, वनप्लस, शाओमी, iQOO,ओपो, रिअलमी, टेन्को स्मार्टफोन, लावा या ब्रॅंड्सच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट देण्यात आला आहे.