Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Grand Onam Sale: स्मार्ट टीव्ही घ्यायचा प्लॅन बनवताय? ही संधी सोडू नका

Amazon Grand Onam Sale: स्मार्ट टीव्ही घ्यायचा प्लॅन बनवताय? ही संधी सोडू नका

Image Source : www.businessinsider.in

सणासुदीचे दिवस म्हणजे ऑनलाईन शाॅपिंगसाठी पर्वणीच असते. कारण, वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक सवलती पाहायला मिळतात. आता अ‍ॅमेझॉनने देखील या आठवड्याच्या सुरूवातीला ग्रँड ओणम सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्हींवर आकर्षक सवलत देण्यात येत आहे.

सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे सर्वच ई-काॅमर्स कंपन्यांमध्ये आकर्षक सवलतीची चढाओढ सुरू आहे. आता ओणम सणानिमित्त अ‍ॅमेझॉनने ग्रँड ओणम सेल सुरू केला असून याद्वारे 29 ऑगस्टपर्यंत शाॅपिंग करता येणार आहे. या सेलद्वरे स्मार्ट फोनसह स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवरही आकर्षक सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांना कमी बजेटमध्ये मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी आम्ही खास माहिती घेऊन आलो आहोत.

LG 4K अल्ट्रा HD स्मार्ट OLED TV

तुम्ही जर LG प्रोडक्टचे चाहते असल्यास, LG 4K अल्ट्रा HD स्मार्ट OLED TV घ्यायची संधी चुकवू नका. या टीव्हीवर तुम्हाला भारी सवलत मिळत आहे. तुम्ही जर हा टीव्ही घ्यायच्या विचारात असल्यास, तुम्हाला हा टीव्ही 61,999 रुपयांत पडणार आहे. यामध्ये 3,000 रुपयांच्या कूपनाचाही समावेश असणार आहे. त्यामळे हा टीव्ही घेतल्यास तुमची 3,000 रुपयांची बचत होणार आहे. हा टीव्ही 48 इंची असून याचा डिस्प्ले OLED आहे. तसेच, यात अनेक फिचर्सचा ही समावेश आहे. विशेष म्हणजे Google सहायक आणि Alexa चाही तुम्हाला वापर करता येणार आहे. तुम्हाला जर हा टीव्ही हप्तेवारी घ्यायचा असल्यास, त्यांच्यासाठी नो-काॅस्ट EMI चा पर्याय उपलब्ध आहे.

Sony Bravia 4K स्मार्ट TV

Sony चा 50 इंचाचा 4K Bravia स्मार्ट टीव्ही (KD-50X64L) आता 51,990 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये युझर्सना 1,000 रुपयांची कूपन ऑफर आणि 2,000 रुपये त्वरित बँक सवलत मिळणार आहे. हे नो कॉस्ट EMI वर देखील उपलब्ध आहे. या टीव्हीची विशेषता ही आहे की हा स्मार्ट टीव्ही गुगल टीव्ही सपोर्टसोबत येतो. तसेच, या टीव्हीला 3 HDMI पोर्ट, डॉल्बी अ‍ॅटमॉस ऑडिओ आणि अ‍ॅपल एअरप्लेचा ही सपोर्ट आहे.

Samsung Crystal iस्मार्ट 4K TV

तुम्ही जर Samsung चा टीव्ही घ्यायचा प्लॅन करत असल्यास, तुम्ही 55-इंचाचा Samsung Crystal iSmart 4K टीव्ही घेऊ शकता. कारण, हा टीव्ही तुम्हाला कूपन आणि इतर ऑफरसह 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घेता येणार आहे. त्यामुळे हा टीव्ही घेतल्यास मोठ्या स्क्रीनचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. तसेच, या टीव्हीवर 12 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे. हा टीव्ही तुम्हाला iSmart 3-साईड बेझल-लेस डिझाईनची सुविधा देते. या टीव्हीला वन बिलियन कलर्स आणि मोशन एक्सीलरेटर सपोर्ट आहे. तसेच, नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार, प्राइम व्हिडिओ आणि इतरांसाठी हॉटकीज स्मार्ट रिमोटसह तुम्हाला सहज याचा अनुभव घेता येणार आहे.

MI X Series 4K TV

Xiaomi चा 55 इंची X Series 4K TV आता 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला घेता येणार आहे. यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये कूपन ऑफर आणि 2,000 रुपये बँक सवलत मिळत आहे. तुम्हाला EMI वर हा टीव्ही घ्यायचा असल्यास, 6  महिन्यांचा नो कॉस्ट EMI चा पर्याय उपलब्ध आहे. हा अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही बेजल-लेस डिझाइनसह येतो. या टीव्हीला 30W स्पीकर्स, 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज आणि पॅचवॉल सपोर्ट आहे. हा टीव्ही घ्यायचा तुम्ही विचार करत असल्यास, तुमची चांगली बचत होऊ शकते.