Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yatharth Hospital IPO: यथार्थ हॉस्पिटलचा IPO गुंतवणुकीसाठी खुला; शेअरची किंमत, लॉट साइज सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा

Yatharth Hospital IPO

Image Source : www.bqprime.com

यथार्थ हॉस्पिटलचा IPO आजपासून (बुधवार) सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या IPO साठी नक्की किती गुंतवणूक करावी लागेल, किती शेअर्सचा लॉट आहे. अर्ज करण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Yatharth Hospital IPO: यथार्थ हॉस्पिटलचा IPO आजपासून (बुधवार) गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सर्व्हिसेस ची भारतात अनेक हॉस्पिटल्स आहेत. भविष्यात व्यवसाय वृद्धीसाठी, कर्जफेड आणि भांडवली खर्च भागवण्यासाठी कंपनीने IPO आणला आहे.

आजपासून गुंतवणूकदारांना IPO साठी अर्ज करता येतील. (Yatharth Hospital IPO) दोन दिवस गुंतवणूक करण्याची मुदत आहे. या IPO मध्ये भाग घेण्याआधी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत. सखोल माहिती घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. 

IPO ची तारीख काय आहे?

आज 26 जुलैपासून IPO सबक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. 28 जुलैपर्यंत म्हणजेच 3 दिवस अर्ज करण्याची मुदत आहे. 4 ऑगस्ट रोजी पात्र गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर जमा होतील. 

शेअरची किंमत किती ठेवली आहे?

गुंतवणूक करताना प्रति शेअरची किंमत 285-300 रुपयांच्या दरम्यान ठेवली आहे. तसेच या शेअरची मूळ किंमत (फेस व्हॅल्यू) 10 रुपये आहे. 

किती शेअर्सचा लॉट खरेदी करता येईल?

सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 50 शेअरचा लॉट खरेदी करता येईल. 14,250 ते 15,000 रुपयांची एकूण गुंतवणूक करावी लागेल. 50 शेअर्सचे जास्तीत जास्त 13 लॉट एक गुंतवणूकदार खरेदी करू शकतो. म्हणजेच या IPO साठी 1,95,000 एवढी गुंतवणूक करता येईल. 

IPO चे एकूण मूल्य किती आहे?

पब्लिक इश्यूद्वारे 676 ते 686 कोटी रुपये यथार्थ हॉस्पिटल उभारणार आहे. यातील फ्रेश इश्यू 490 कोटींचे असतील. तसेच हॉस्पिटलचे मालक 65.51 हजार रुपयांचे समभाग विक्रीसाठी ठेवणार आहेत. यास ऑफर फॉर, सेल असे म्हणतात. 

भांडवली बाजारातून पैसे उभारण्याचे कारण का?

यथार्थ हॉस्पिटलला भविष्यात आपला व्यवसाय वाढवायचा आहे. म्हणजेच देशातील आणखी अनेक शहरांत रुग्णालये सुरू करायची आहेत. तसेच सोई-सुविधाही वाढवायच्या आहेत. सोबतच कंपनीवरील कर्जाची फेड, भांडवली खर्च, व्यवसाय वृद्धीसाठी मार्केटिंगवरील खर्चासाठी कंपनीला पैशांची आवश्यकता आहे. त्यासाठी IPO बाजारात आणला आहे. 

यथार्थ हॉस्पिटलबद्दल अधिक माहिती?

यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सर्व्हिसेसचे सध्या दिल्ली आणि शेजारील नोयडा परिसरात 3 रुग्णालये आहेत. मध्य प्रदेशातील झाशी जिल्ह्यात 305 खाटांचे एक रुग्णालयही विकत घेतले आहे. हे रुग्णालय सुरू झाले असून या परिसरातील मोठे रुग्णालय आहे.  सर्व हॉस्पिटल मिळून 609 डॉक्टरांची टीम तर सुमारे दीड हजार बेड आहेत. 

कंपनीची आर्थिक स्थिती?

मागील तीन आर्थिक वर्षात यथार्थ हॉस्पिटलच्या उत्पन्नाचा आलेख वर जात आहे. कंपनीचा EBITDA वार्षिक 41% दराने वाढला आहे. 2021 वर्षात रुग्णालयाचा निव्वळ नफा 19 कोटी रुपये होतो. 2022 मध्ये वाढ होऊन 44 कोटींवर गेला. तर 2023 आर्थिक वर्षात नफा 65 कोटींच्या घरात गेला आहे.

कंपनीचे एकूण मूल्य 2021 साली 72.45 रुपये होते. त्यात वाढ होऊन 2023 साली एकूण मूल्य 182.96 कोटी रुपये झाले आहे. 864 खाटांची संख्या दोन वर्षात दीड हजारांवर पोहचली आहे. बेड ऑक्युपन्सी रेटही 49 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. 

रुग्णालयाच्या प्रमोटर्सबद्दल

यथार्थ हॉस्पिटलचे मालक स्वत: डॉक्टर आहेत. तसेच कंपनीच्या संचालक मंडळावर सेवा, वैद्यकीय, बँकिंग, फायनान्स आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी सदस्य आहेत. कंपनीचे कार्यकारी संचालक कंपनीचा विस्तार परदेशात करण्याचेही नियोजन आखत आहेत. यथार्थ त्यागी यांनी परदेशातून उच्च शिक्षण घेतले आहे. 

गुंतवणुकीतील धोके?

हॉस्पिटल व्यवसाय अनुभवी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. जर भविष्यात कौशल्य असणारे मनुष्यबळ आणता आले नाही तर रुग्णालयाची प्रगती रोडावू शकते. आरोग्य क्षेत्रात काम करत असताना ब्रँड इमेज जपणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, चुकीच्या घटना, आरोप माध्यमांतून झाले तर रुग्णालयाच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली नाही तर भांडवली खर्च वाढून नफा कमी होऊ शकतो.