तुमच्याकडे एक रकमी मोठी रक्कम आहे आणि ती तुम्हाला ठराविक वर्षासाठी कुठेतरी गुंतवायची असेल, तर तुम्ही वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांची निवड करू शकता. यामध्ये म्युच्युअल फंड (Mutual Fund), बँकेतील मुदत ठेव (FD) किंवा इतर आर्थिक योजनांचा समावेश करण्यात आला आहेत. मात्र तुम्हा सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत (National Savings Certificate Scheme) गुंतवणूक करू शकता.
या योजनेत एकरकमी पैसे गुंतवून 5 वर्षांनंतर निश्चित आणि सर्वाधिक परतावा मिळवू शकता. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांची कर सवलत (Tax Free) मिळवता येते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला सर्वाधिक व्याजदर मिळवता येईल. सर्वाधिक व्याजदर मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल, त्याचे गणित काय? समजून घेऊयात.
Table of contents [Show]
सर्वाधिक व्याजदराचा होईल फायदा
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत एप्रिल 2023 ते जून 2023 या काळात 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. हा व्याजदर पोस्टातील आणि बँकेतील मुदत ठेवीच्या व्याजापेक्षा सर्वात जास्त आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षाचा आहे. या योजनेतील व्याजदर सरकार दर तीन महिन्यांनी सुनिश्चित करते. अशा वेळी हा व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतो.
तुमचा फायदा जाणून घ्या
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत (National Savings Certificate Scheme) मुदत ठेवीपेक्षा जास्त व्याजदर देण्यात येतो. तसेच यातील परतावा हा निश्चित स्वरूपातील असून ही गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. ही एक सरकारी योजना असल्याने यामधील पैशांची हमी सरकार घेते. यातील 1.50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला कर सवलतीचा लाभ (Tax Free) घेता येणार आहे. दरवर्षी या योजनेत गुंतवणूक करून ग्राहक कर सवलतीचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय या गुंतवणुकीत नॉमिनी लावण्याची सुविधा देण्यात येत आहे.
कोण गुंतवणूक करू शकते?
भारतातील सर्व रहिवासी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करू शकतात. एनआरआय (NRI) लोक यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. गुंतवणुकीवेळी एखाद्या व्यक्तीने यामध्ये गुंतवणूक केली आणि मॅच्युरिटीवेळी तो एनआरआय झाला असेल, तरीही त्याला परतावा मिळतो. कोणतेही ट्रस्ट किंवा अविभक्त कुटुंब (HUF) एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. HUF मधील कर्ता व्यक्ती देखील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत केवळ स्वतःच्या नावाने गुंतवणूक करू शकतो.
गुंतवणुकीचे गणित समजून घ्या
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेतील (National Savings Certificate Scheme) गुंतवणुकीवर चक्रवाढ पद्धतीने व्याजदर दिले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षाचा असल्याने यामध्ये 25 लाख रुपये गुंतवल्यावर 7.7 टक्के व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटी वेळी 36 लाख 22 हजार 585 रुपये मिळणार आहेत. या गुंतवणुकीवर निव्वळ तुम्हाला 11 लाख 22 हजार 585 रुपये मिळणार आहेत.
तसेच या योजनेत 10 लाख रुपये गुंतवल्यावर 7.7 टक्के व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटी वेळी 14 लाख 49 हजार 034 रुपये मिळतील. या कालावधीत निव्वळ 4 लाख 49 हजार 34 रुपयांचे व्याज मिळेल.
Source: hindi.financialexpress.com