Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Most Expensive Phone: Ferrari पेक्षाही महागडा फोन; एवढ्या किमतीत येऊ शकते अलिशान घर!

Most Expensive iPhone

Image Source : www.avcaesar.com

Most Expensive Phone: कॅविअर या कंपनीने ब्रिटिश ज्वेलरी ब्रॅण्ड ग्रैफ यांच्यासोबत मिळून iPhone 14 Pro Maxची स्पेशल एडिशन डिझाईन केली आहे. कंपनीने याचे काही निवडक हॅण्डसेट तयार केले आहेत. ज्याला कंपनीने डायमंड स्नोफ्लेक नाव दिले आहे. त्यामुळे या सर्वांत महागड्या फोनचे नाव आहे, Caviar iPhone 14 Pro Max Diamond Snowflake.

Most Expensive Phone: आतापर्यंत आपल्यासाठी महागडा फोन म्हणजे अ‍ॅपलचा आयफोन हे समीकरणच झाले आहे. पण यामध्येही फोनच्या किमतीचा एक सर्वसामान्यांना अंदाज होता. पण यावेळी अ‍ॅपलने एका आयफोनचे असे डिझाईन केले आहे. ज्याची किंमत Ferrari 488 Spider मॉडेलपेक्षाही जास्त आहे. अ‍ॅपल कंपनीने रशियामधील Caviar कंपनीसोबत मिळून iPhone 14 Pro मॉडेल तयार केले आहे. या मॉडेलची किंमत जवळपास 5 कोटी रुपये आहे.

कॅविअर या कंपनीने ब्रिटिश ज्वेलरी ब्रॅण्ड ग्रैफ यांच्यासोबत मिळून iPhone 14 Pro Maxची स्पेशल एडिशन डिझाईन केली आहे. कंपनीने याचे काही निवडक हॅण्डसेट तयार केले आहेत. ज्याला कंपनीने डायमंड स्नोफ्लेक नाव दिले आहे. त्यामुळे या सर्वांत महागड्या फोनचे नाव आहे, Caviar iPhone 14 Pro Max Diamond Snowflake.

या फोनमध्ये एवढे काय आहे?

या स्पेशल फोनच्या मागे प्लॅटिनम आणि व्हाईट गोल्डचे (Platinum & White Gold) पेंडेंट लावण्यात आले आहे. तसेच त्याची बॉर्डर गोल आणि मार्कीज-कट हिऱ्यांनी सजवण्यात आली आहे. या हिऱ्यांची किंमत अंदाजे 62 लाख रुपये आहे. फोनच्या मागे बसवण्यात आलेली बॅक प्लेट ही 18 कॅरेड व्हाईट गोल्डपासून बनवण्यात आली आहे. तसेच त्याच्या सोबत 570 हिऱ्यांनी मिळून तयार केलेला एक पॅटर्न बसवण्यात आला आहे. या स्पेशल एडिशन स्मार्टफोनमध्ये हिऱ्यांबरोबरच काही महत्त्वाच्या आणि महागड्या धातुंचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे याची किंमत 5 कोटी रुपये इतकी झाली आहे.

फोनवर दिली जातेय 1 वर्षाची वॉरंटी

Caviar iPhone 14 Pro Max Diamond Snowflake या स्पेशल एडिशन असलेल्या 5 कोटी रुपयांचा फोन घेणाऱ्यांची संख्या खूपच मर्यादित असू शकते. कॅविअर कंपनी या फोनची विक्री आपल्या वेबसाईटवरून करत आहे. तिथे याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. कंपनीने या एवढ्या महागड्या फोनसाठी एक वर्षाची गॅरंटीसुद्धा दिली आहे.

अ‍ॅपलने आपल्या iPhone 14 Pro Max, 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 1,39,900 रुपये ठेवली आहे. त्याच फोनमध्ये वेगवेगळ्या हिऱ्यांचा आणि मौल्यवान धातुंचा उपयोग करून कॅविअर कंपनीने या फोन किंमत 5 कोटी रुपयांवर नेऊन ठेवली आहे.