Upcoming IPO: ऑगस्ट महिन्यामध्ये 10 कंपन्यांचे IPO (Initial public offering) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना नवख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. या दहा कंपन्या बाजारातून 8 हजार कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत. विविध क्षेत्रातील या कंपन्या कोणत्या आहेत ते पाहूया.
दहा कंपन्यांचे आयपीओ येणार
SBFC Finance, कॉनकॉर्ड बायोटेक, ज्युपिटर लाइफलाइन हॉस्पिटल, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन, बालाजी स्पेशालिटी केमिकल्स, यात्रा ऑनलाइन, इनोव्हा कॅपटॅब, ऐरोफ्लेक्स इंडस्ट्रिज, रिषभ इन्स्ट्रुमेंट्स आणि Vishnu Prakash R Punglia लिमिटेड या कंपन्यांचे IPO येणार आहेत.
अहमदाबाद येथील कॉनकॉर्ड बायोटेक या कंपनीचा 1551 कोटींचा आयपीओ आजपासून (शुक्रवार) सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. तर मुंबई येथील बिगर बँकिंग वित्त संस्था SBFC फायनान्सचा IPO बुधवारी खुला झाला. IPO साठी भांडवली बाजारातील स्थिती चांगली असून सेकंडरी मार्केटमधील उलाढाल वाढण्याची कंपन्यांना अपेक्षा आहे.
मुंबईतील ज्युपिटर लाइफलाइन हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. (IPO in August 2023) या रुग्णालयाचा 1200 कोटींचा IPO येणार आहे. या रुग्णालयाची 1200 खाटांची क्षमता आहे. भविष्यात आणखी रुग्णालये सुरू करण्यासाठी कंपनी पैसे उभारत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर येथील Balaji Speciality Chemicals या कंपनीचाही 250 कोटींचा आयपीओ येणार आहे.
मागील महिन्यात चार कंपन्यांनी 2,213 कोटी रुपया उभारले. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 111 पट सबस्क्राइब झाला. तर नेटवेब या टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 91 पट सबस्क्राइब झाला. सेन्को गोल्ड आणि PKI Ventures या कंपन्यांचाही आयपीओ आला होता.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)