Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yatra Online IPO 15 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला; गुंतवणुकीपूर्वी संपूर्ण माहिती जाणून घ्या

Yatra Online IPO

Image Source : www.en.wikipedia.org.com

Yatra Online IPO: यात्रा ऑनलाईन कंपनीचा आयपीओ 15 ते 20 सप्टेंबरदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 602 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विकणार आहे.

Yatra Online IPO: ऑनलाईन ट्रॅव्हल ॲग्रीग्रेटर कंपनी यात्रा ऑनलाईन (Yatra Online) कंपनीचा आयपीओ (Initial Public Offering-IPO) शुक्रवारपासून (दि. 15 सप्टेंबर) खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 20 सप्टेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

यात्रा ऑनलाईन कंपनीने अजून आयपीओच्या प्रति शेअर्सची किंमत जाहीर केलेली नाही. ती लवकरच केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, अँकर गुंतवणूकदारांना 14 सप्टेंबरला या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

किती शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असणार?

कंपनीने 602 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स विकण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय कंपनीचे प्रमोटर आणि इतर गुंतवणूकदारांकडून 1.21 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. प्रवर्तक THCL ट्रॅव्हल होल्डिंग सायप्रस लिमिटेड (THCL Travel Holding Cyprus) कंपनी 1.17 कोटी शेअर्स विकणार आहे. तर गुंतवणूकदार पंडारा ट्रस्ट (Pandara Trust-Scheme I) आपले सर्व 4 लाख शेअर्स विकून कंपनीतून बाहेर पडणार आहे.

यात्रा ऑनलाईन कंपनी ही ट्रॅव्हल सेक्टरमधील तिसरी मोठी कंपनी मानली जाते. कंपनीने प्री-आयपीओच्या माध्यमातून 62.01 कोटी रुपये उभारले आहेत. तसेच THCL कंपनीला 236 रुपये प्रति शेअर्सच्या किमतीने 26.27 लाख शेअर्सचे वाटप केले आहे. यामुळे कंपनीच्या एकूण नवीन 750 शेअर्समधून जवळपास 148 कोटी रुपयांचे शेअर्स कमी झाले आहेत.

कंपनीच्या भविष्यातील योजना

क्रिसिलच्या अहवालानुसार, यात्रा ऑनलाईन ही भारतातील कॉर्पोरेट ट्रॅव्हल सर्व्हिस देणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. तर भारतातील तिसऱ्या क्रमांकाची ट्रॅव्हल कंपनी आहे. कंपनीचे 813 हून अधिक कॉर्पोरेट कस्टमर असून, जवळपास 49,800 नोंदणीकृत SME ग्राहक आहेत. तर संपूर्ण देशात यांचे 29,800 ट्रॅव्हल एजंट्सचे नेटवर्क कार्यरत आहे.

आयपीओच्या माध्यमातून जमा होणाऱ्या एकूण निधीपैकी कंपनी 150 कोटी रुपये गुंतवणूक आणि कंपनीच्या वाढीसाठी वापरणार आहे. याशिवाय नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांच्या सोयीसाठी आणि कंपनीच्या भांडवली गुंतवणुकीसाठी साधारण 392 कोटी रुपयांचा निधी वापरणार आहे.