चांगल्या पगाराची नोकरी, मनासारखा जॉब, कामाबद्दल पॅशन आणि समाजाप्रति काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणारे लाखो इंजिनिअर्स दरवर्षी कॉलेजेसच्या कारखान्यातून बाहेर पडतात. इंजिनिअरिंगमध्ये अनेक प्रकारच्या शाखा आहेत. प्रत्येक शाखेचं वेगळं महत्त्व आहे. त्यानुसार या इंजिनिअर्सना पगार आणि वेगवेगळ्या सुविधा मिळतात.
नासकॉम (NAASCOM) संस्थेने 2019 मध्ये केलेल्या एका सर्व्हेनुसार कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या एकूण इंजिनिअरपैकी फक्त 2.5 ते 3 लाख इंजिनिअर्सना आपल्या क्षेत्रात नोकरी मिळत आहे. उर्वरित इंजिनिअर्स मिळेल त्या क्षेत्रात नोकरी करत आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारने केलेल्या India Skills Report मध्ये जवळपास 50 टक्के इंजिनिअर्सच नोकरी मिळवण्यासाठी योग्य असल्याचे दिसून आले आहे. त्यात इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखांपैकी काही ठराविक शाखांमधील इंजिनिअर्सना चांगले पॅकेज मिळते. चला तर इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखा आणि त्यांना मिळणारे पॅकेज समजून घेऊया.
Table of contents [Show]
इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखा
इंजिनिअरिंगमध्ये काही ठराविक ट्रेड्सना खूप मागणी आहे. जसे की, आतापर्यंत कॉम्युटर इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरला खूप मागणी होती. पण आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे कॉम्प्युटरकडे असलेली ओढ कमी होऊ लागल्याचे दिसून येते. याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर, स्पेस इंजिनिअर, ऑटोमोबाईल इंजिनिअर, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअर अशा आणखी काही प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या शाखा आहेत. या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच साईट आहेत; जिथे इंजिनिअर लागतात.
इंजिनिअरिंगची पात्रता
इंजिनिअर होण्यासाठी बेसिक 3 ते 4 प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंगच्या शिक्षणात बेसिक गोष्टींपासून ते त्या सेक्टरमधील अद्ययावत गोष्टींची माहिती शिकवली जाते. इंजिनिअर होण्यासाठी इयत्ता दहावीनंतर डिप्लोमा किंवा बारावीनंतर डायरेक्ट डिग्रीला (BE-Bachelor of Engineering) प्रवेश मिळतो. बीईनंतर एमई (ME-Master of Engineering) त्यानंतर बीटेक, एमटेकचे शिक्षण घेता येते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यामध्ये JEE MAIN, JEE Advanced आणि MHTCET आदी परीक्षा द्यावा लागतात.
सर्वाधिक पगार देणाऱ्या शाखा
सध्या मार्केटमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगला डिमांड असून या शाखेतील नवीन इंजिनिअर्सना वर्षाला 2 ते 8 लाखाचे पॅकेज मिळते. त्यानंतर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला मोठी मागणी आहे. या दोन सेक्टरमधील फ्रेशर्स इंजिनिअर्सला वर्षाला 1.8 ते 5 लाखापर्यंतचे पॅकेज मिळते. त्याचबरोबर सिव्हिल आणि बायोटेक्नोलॉजी इंजिनिअर्सना 3 ते 8 लाखांचे पॅकेज ऑफर केले जाते.
इंजिनिअर्सची सर्वाधिक मागणी
इंजिनिअर्सना सर्व सेक्टरमधून मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामध्ये फेसबुक (मेटा), गुगल, मायक्रोसॉफ्टसोबत टाटा मोटर्स, लार्सन अॅण्ड टर्बो, गोदरेज, सिमेन्स, इस्त्रो, प्लॅस्टिक कंपन्या, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि कोल इंडिया यासारख्या कंपन्यांमधून नेहमीच मागणी असते.
Source: www.leverageedu.com