• 28 Nov, 2022 17:26

Mineral Water and Packaged Drinking water मध्ये काय फरक आहे? यासाठी किती खर्च येतो?

mineral water and packaged drinking water cost

Difference Between Mineral Water and Packaged Drinking water : सध्याची भारताची मिनरल आणि पॅकेज ड्रिकिंग वॉटरची बाजारपेठ 20 हजार कोटींच्या आसपास आहे. यामध्ये मोठमोठ्या नामांकित ब्रॅण्डससोबत गल्लोगल्ली सुरू असलेल्या लोकल ब्रॅण्डची संख्या मोठी आहे.

टाटा ग्रुपमधील टाटा कन्झुमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (Tata Consumer Products Limited-TPCL) कंपनीने बॉटलबंद पाणी विकणारा नामांकित ब्रॅण्ड बिसलेरीसोबतची डील फायनल केल्याचे बोलले जात आहे. या डीलसाठी टाटांनी 6 ते 7 हजार कोटींची बोली लावल्याची चर्चा आहे. ही डील काही दिवसांत पूर्ण होईलच. पण एक प्रश्न असा निर्माण होतो की, टाटा कंपनी यापूर्वीच हिमालया या नावाच्या ब्रॅण्डने मिनरल वॉटर व्यावसायात आहे. तरीही टाटाने बिसलेरीसोबतची डील पक्की करून नव्याने पॅकेज ड्रिकिंग वॉटर इंडस्ट्रीमध्ये येण्याचे कारण काय? मिनरल वॉटर आणि पॅकेज ड्रिकिंग वॉटर यामध्ये काय फरक आहे? आणि या इंडस्ट्रीच्या उभारणीसाठी साधारण किती खर्च येतो? याची माहिती आपण घेणार आहोत.

भारतात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ 20 हजार कोटींच्या आसपास...

सध्याची भारताची मिनरल आणि पॅकेज ड्रिकिंग वॉटरची बाजारपेठ 20 हजार कोटींच्या आसपास आहे. यात बिसलेरी ब्रॅंडचे वर्चस्व असून, त्यांचा यात एकूण 32 टक्के हिस्सा आहे. पण जवळपास 60 टक्के हिस्सा हा लहानमोठ्या कंपन्यांचा आहे. यामध्ये बराचसा भाग हा पॅकेजिंग ड्रिकिंग वॉटरचा असल्याचे दिसून येते.

मिनरल वॉटर म्हणजे काय?

मिनरल वॉटर हे नावाप्रमाणेच खनिजांनी युक्त असलेले म्हणजेच नैसर्गिक स्त्रोताद्वारे उपलब्ध झालेले पाणी आहे. मिनरल वॉटरमध्ये नैसर्गिक खनिजद्रव्ये असतात. हे पाणी नैसर्गिक झरा व त्याप्रकारच्या नैसर्गिक स्त्रोतांद्वारे उपलब्ध केले जाते.

मिनरल वॉटर ओळखायचे कसे?

मिनलर वॉटरच्या बॉटलवर IS 13428 हा ट्रेड मार्क असतो. मिनरल वॉटरमध्ये भारतात बिसलेरीच्या वेदिका प्रोडक्टच्या 1 लीटरच्या बॉटलची किंमत 60 रुपये तर हिमालया ब्रॅण्डची  1 लिटरची बॉटल 70 रुपयांना उपलब्ध आहे. हे लोकांना माहित असलेले ब्रॅण्ड आहेत. याशिवाय Beverly Hills 9OH2O,  KONA DEEP, Voss Artesian, Aava, Evian, Evocus & Qua हे मिनरल वॉटरमधील सर्वांत महागडे ब्रॅण्डस् आहेत. या ब्रॅण्डच्या एका बॉटलची किंमत काही हजारांमध्ये आहे.

पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटर म्हणजे काय?

पॅकेज ड्रिंकिंग वॉटर म्हणजे सर्वसाधारण नळाद्वारे उपलब्ध झालेले पाणी जे कंपनी फिल्टर किंवा RO प्रक्रियेचा वापर करून बाटलीमध्ये उपलब्ध करून देते. पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटरसाठी कंपन्यांना वेगवेगळ्या स्त्रोतांमधून पाणी उपलब्ध होते. हे पाणी कंपन्या फिल्टर करून बॉटलमध्ये भरतात.  

पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ओळखायचे कसे?

पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या बॉटलवर IS 14543 हा मार्क असतो. पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये भारतात बिसलेरी, अक्वाफिना, किनली, पतंजली दिव्यजल आणि बेली (Bisleri, Aquafina, Kinley, Patanjali Divyajal and Bailley) या प्रसिद्ध ब्रॅण्डबरोबरच गावोगावी लोकल ब्रॅण्ड ही बरेच उपलब्ध आहेत.

बॉटलबंद पाण्याच्या व्यवसायातील काळे-बेरे!

बॉटलबंद पाण्याचा व्यवसाय वर्षाचे बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे. भारतातील बाटली बंद पाण्याचा व्यवसाय फारच वादग्रस्त आहे. सध्या मार्केटमध्ये शेकडोने बाटली बंद पाणी विकणारे ब्रॅण्ड उपलब्ध आहेत. यामध्ये जितक्या मोठमोठ्या नामांकित कंपन्या सहभागी आहेत. तितक्याच प्रमाणात किंवा त्याहीपेक्षा अधिक संख्येने गल्लोगल्ली बॉटलबंद पाण्याचे व्यवसाय सुरू आहेत. सरकारने बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना अनेक नियम घालून दिले आहेत. पण हे नियम धाब्यावर बसवून सर्रास हा व्यवसाय सुरू आहे.

पॅकेज ड्रिकिंग वॉटर व्यावसायातील नफा-तोटा!

पॅकेज ड्रिकिंग वॉटर किंवा बॉटल बंद पाण्याचा व्यवसाय करण्यासाठी मुळात तुमच्याकडे मोकळी जागा असणे आवश्यक आहे. त्यानंतर व्यावसायिक RO वॉटर प्लॉन्ट मशीनचा खर्च, मोकळ्या बॉटल्स (साईजनुसार) आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाची परवानगी आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पूर्तता करणे. पण सध्या गावोगावी असे बॉटल बंद पाणी विकणाऱ्याचे व्यवसाय उभे केले आहेत.